Atharva Sudame: कोण काय करतो ते बघूया...; अथर्व सुदामेला असिम सरोदेंचा सपोर्ट, राज ठाकरेंना थेट फोन लावला...

Asim Sarode On Atharva Sudame Controversy: पुण्यातील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अथर्व सुदामे याच्या गणेशोत्सव विशेष रीलवरून सुरू झालेल्या वादात आता नवे वळण आले आहे.
Asim Sarode On Atharva Sudame Controversy:
Asim Sarode On Atharva Sudame Controversy: Saam Tv
Published On
Summary

पुण्यातील इन्फ्लुएंसर अथर्व सुदामेच्या रीलवरून वाद निर्माण

वकील असिम सरोदे यांनी रीलला आक्षेपार्ह नसल्याचं सांगत पाठिंबा दिला

सरोदेंनी राज ठाकरे यांना मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं

या प्रकरणामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सोशल मीडियावरील चर्चेला नवं वळण

Atharva Sudame Controversy: पुण्यातील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अथर्व सुदामे याच्या गणेशोत्सव विशेष रीलवरून सुरू झालेल्या वादात आता नवे वळण आले आहे. प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांनी सार्वजनिकरित्या अथर्वच्या पाठीशी उभे राहत त्याला संपूर्ण पाठिंबा दिला आहे.

सरोदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, अथर्वचा रील हा कुठल्याही प्रकारे आक्षेपार्ह नव्हता, उलट त्यातून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला गेला होता. सोशल मीडियावरील प्रतिक्रिया आणि टीका यामुळे घाबरून त्याने रील हटवणे योग्य नव्हते, असं मत त्यांनी मांडलं. “कोणाला वाटलं असेल की हा रील चुकीचा आहे, तर तो त्यांचा गैरसमज आहे असं ते म्हणाले.

Asim Sarode On Atharva Sudame Controversy:
Prasad Oak: रील्स म्हणजे अभिनय नाही...; प्रसाद ओकच्या वक्तव्याने रंगली चर्चा, सोशल मीडियावर नवा वाद पेटणार

यासोबतच सरोदेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे थेट मदतीची मागणी केली आहे. “राज ठाकरे यांनी आधीच अथर्वच्या कामाचं कौतुक केलं होतं. त्यामुळे आता काही धर्मवादी गट तक्रारी करत असताना, राज ठाकरे आणि मनसे यांनी पुढे येऊन त्याच्या बाजूने ठाम उभं राहायला हवं,” असा आग्रह त्यांनी व्यक्त केला.

Asim Sarode On Atharva Sudame Controversy:
Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढाच्या घरी येणार नवा पाहुणा; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

सरोदेंनी अथर्वला थेट आवाहन दिलं “तो व्हिडिओ पुन्हा अपलोड कर. कोण काय करतो ते बघूया.” त्यांच्या या विधानामुळे आता सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेला आणखी ऊत आला आहे. अथर्व सुदामेच्या या वादग्रस्त रीलवरून अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक माध्यमांचं प्रभाव, आणि राजकीय संरक्षण यावर नवी चर्चा रंगू लागली आहे.

अर्थव सुदामेच्या रीलमध्ये नेमकं काय?


या रीलमध्ये अथर्व सुदामे एका भाविकाची भूमिका साकरात आहे. जो गणपती कोणती घ्यायची हे ठरवण्यासाठी जातो. गणपतीचा मूर्तीकार हा मुस्लिम घरातील आहे. अथर्व सुदामे मूर्ती खरेदी करेल की नाही? असा प्रश्न त्या मूर्तीकारला होता. पण अथर्व म्हणतो, माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीर खुर्माही. तसेच आपण वीट व्हावं जी वीट देवाळातही लावली जाते आणि मशिदीमध्येही. या रीलवरुन अथर्व सुदामेवर टीका होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com