The Kapil Sharma Show: अर्चना पुरण सिंहला वाटतेय खुर्ची जाण्याची भीती, 'या' बॉलिवूड अभिनेत्रीपासून आहे धोका

नवज्योत सिंग सिद्धूपासून अभिनेत्रीची जजची खुर्ची धोक्यात असल्याचं म्हटलं जातं.
Archana Puran Singh
Archana Puran SinghInstagram @archanapuransingh
Published On

Comedy Show Update: बॉलिवूड अभिनेत्री आणि 'द कपिल शर्मा शो'ची जज अर्चना पूरण सिंह ही नेहमीच कपिल शर्माच्या निशाण्यावर असते. कपिल शर्मा तिच्यावर विनोद करण्याची एकही संधी सोडत नाही. अर्चनाने अनेक कॉमेडी रिअॅलिटी शोज जज आहेत. अर्चना 'द कपिल शर्मा' शोमध्ये 2019 साली नवज्योत सिंग सिद्धूची जागी जज म्हणून आल्या. यावरून अर्चनावर सोशल मीडियावर अनेक वेळा मीम्स व्हायरल होत असतात. नवज्योत सिंग सिद्धूपासून अभिनेत्रीची जजची खुर्ची धोक्यात असल्याचं म्हटलं जातं. पण, आता अर्चना पूरण सिंह यांनी स्वत: सांगितले आहे की, त्यांची खुर्ची सिद्धूपासून नाही, तर दुसऱ्या अभिनेत्रीमुळे धोक्यात आहे.

नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये अर्चना पूरण सिंहने सांगितले की, बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीपासून तिची खुर्ची धोक्यात आहे. ती म्हणाला की शोमध्ये फक्त बॉलिवूड अभिनेत्री काजोलच तिची जागा घेऊ शकते. कारण काजोल न थकता तासनतास हसू शकते. काजोल तिच्या आगामी 'सलाम वैंकी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये गेली होती.

Archana Puran Singh
Har Har Mahadev: ....अन्यथा झी टॉकिजचे कार्यालय फोडू

'द कपिल शर्मा शो'मध्ये 'सलाम वैंकी'तील कलाकार काजोल देवगण, रेवती आणि विशाल जेठवा यांनी हजेरी लावली होती. कपिलने काजोलचे कौतुक केले आणि म्हणाला की, जेव्हा ती शोमध्ये येते तेव्हा तिच्यावरून नजर हटवणे खूप कठीण होते. जयविजय सचान आणि राजीव ठाकूर यांनी सेटवर आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी काजोलच्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातील एक दृश्य रीक्रिएट केले.

जेव्हा जयविजय सचान, शाहरुख खान आणि अजय देवगणची नक्कल करत 'कुछ कुछ होता है'चा डायलॉग बोलत होता, तेव्हा काजोल हसणे थांबवू शकत नाही आणि मनापासून हसत होती. काजोल म्हणते की, जेव्हाही ती या शोमध्ये असते तेव्हा ती खूप आनंदी होते. काजोल म्हणाली- 'मी इथे इतक्या जोरात हसते की माझे गाल दुखू लागतात. मग मी विचार करतो की मी न थांबता 3 तास कसे हसू शकेन.' काजोलचे म्हणणे ऐकून अर्चना म्हणाली- 'माझी खुर्ची कोणी हिसकावून घेऊ शकत असेल तर ती दुसरी कोणी नसून काजोल आहे.'

काजोल सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट 'सलाम वैंकी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात विशाल जेठवा आणि आहाना कुमरा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात काजोल एका आईच्या भूमिकेत आहे. जी तिचा आजारी मुलगा वैंकीची काळजी घेण्यात व्यस्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com