लसीकरणात जसा भेदभाव झाला नाही तसा सिनेमामध्येही होऊ नये - अनुराग ठाकुर

लसीकरणात जसा भेदभाव झाला नाही तसा सिनेमामध्येही होऊ नये असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकुर यांनी केले. ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरणावेळी ते बोलत होते.
लसीकरणात जसा भेदभाव झाला नाही तसा सिनेमामध्येही होऊ नये - अनुराग ठाकुर
लसीकरणात जसा भेदभाव झाला नाही तसा सिनेमामध्येही होऊ नये - अनुराग ठाकुरSaam Tv News
Published On: 

संतोष शाळिग्राम, नवी दिल्ली

नवी दिल्ली: "सिनेमा मोठ्या सिनेमागृहातून बाहेर आणून तो सामान्यंपर्यत कसा पोचविता येईल याचा विचार करावा लागेल. जसं कोरोना प्रतिबंधक लसीकरणावेळी गरीब-श्रीमंत असा भेद राहिला नाही, तसं सिनेमाबाबतही व्हायला पाहिजे" असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकुर यांनी केले. ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards 2019) वितरणावेळी ते बोलत होते. (Anurag Thakur: There should be no discrimination in cinema as there is no discrimination in vaccination)

हे देखील पहा -

आज एक सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेले, तर किती खर्च होतो. म्हणून देशातील छोटे-मोठे हॉल, स्टेडियम, सभागृहे या ठिकाणी देखील सिनेमा दाखविला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन ठाकूर यानी केले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला. आनंदी गोपाळसाठी समीर विद्वांस यांना ताज महाल या मराठी चित्रपटालाही रजत कमळ प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट अभिनयासाठी मनोज वाजपेयी (भोंसले), कंगणा राणावत (मनिकर्णिक) यांना गौरविण्यात आले.

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून बार्डोचा गौरव करणात आला. निर्माता- ऋतुजा गायकवाड, दिग्दर्शक भीमराव मोरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट शोध चित्रपटाचा पुरस्कार जक्कल या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. प्रतिक सुरेश जोशी, विवेक वाघ पिकासो चित्रपटासाठी अभिषेक मोहन वारंग विशेष प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. लता भगवान करे : एक संघर्ष गाथा या चित्रपटासाठी लता करे यांना पुरस्कार देण्यात आला. खिसा संतोष मिठाणी, राज प्रीतम मोरे, अशोक राणे यांचा चित्रपट पाहिलेला माणूस पुस्तकासाठी विशेष पुरस्कार देण्यात आला.

लसीकरणात जसा भेदभाव झाला नाही तसा सिनेमामध्येही होऊ नये - अनुराग ठाकुर
भारत- पाक मॅच नंतर काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला...(पहा व्हिडिओ)

सर्वोत्कृष्ट गायक:

रजत कमल पुरस्कार: सावनी रवींद्र,सिनेमा- बार्डो,

सर्वोत्कृष्ट मुलांचा चित्रपट: कस्तूरी (हिंदी) चित्रपट दिग्दर्शन, निर्माते - डॉ. पायल डोके, दिगदर्शक - विनोद कांबळे

सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटः आनंदी गोपाळ, मंगेश कुलकर्णी, दिग्दर्शक - समीर विश्वास

राष्ट्रीय एकात्मतावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटः ताजमहाल आदींना पुरस्कार देण्यात येणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com