
Anurag Kashyap: चित्रपट दिग्दर्शक 'अनुराग कश्यप' सध्या चर्चेत आहे आणि त्याचे कारण म्हणजे त्याने केलेले फुले चित्रपटाच्या वादावरील अपमानास्पद विधान. या विधानावर माफी मागितल्यानंतर सोशल मीडियावर अनुरागबद्दल चर्चा सुरू आहे. या दरम्यान, अनुराग कश्यपने आणखी एक पोस्ट शेअर करत पुन्हा व्यंगात्मक टीका केली आहे.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते अनुराग कश्यप सध्या त्याच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावर अनुरागबद्दल चर्चा रंगली आहे. दरम्यान, आता चित्रपट निर्मात्याने अशी एक पोस्ट शेअर केली आहे जी प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. अनुरागने या पोस्टमध्ये ब्राह्मणांच्या प्रेमाबद्दल व्यंगात्मक आभार मानले आहेत. त्यामुळे ही पोस्ट मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे.
अनुराग कश्यपची पोस्ट
अनुराग कश्यपने त्याच्या इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. अनुरागच्या पोस्टमध्ये त्याचा फोटो हसताना दिसतोय, पण या फोटोमागे लिहिलेला मजकूर खूपच अपमानजनक आहे. या फोटोच्या मागे अनुराग कश्यपने स्वतःलाच शिवी घातली आहे.
माझ्या प्रिय सुसंस्कृत ब्राह्मणांसाठी खूप प्रेम - अनुराग
पोस्ट शेअर करताना अनुरागने कॅप्शनमध्ये लिहिले की माझ्या प्रिय सुसंस्कृत ब्राह्मणांकडून एवढं प्रेम... खूप खूप धन्यवाद. यावर, अनुरागच्या पोस्टवर लोकांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'फुले' चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा वाद अलिकडेच सुरू झाला आहे. या चित्रपटात 'ज्योतिबा फुले' यांची जीवनकथा दाखवण्यात आली आहे, परंतु चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याला विरोध करण्यात आला. यावर अनुरागने एक वादग्रस्त पोस्ट केली.
चित्रपटाची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली
महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने चित्रपटावर यावर नाराजी व्यक्त केली आणि चित्रपटातील पात्रांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप केला. वाढता वाद पाहून निर्मात्यांना चित्रपटाची रिलीज तारीख पुढे ढकलावी लागली आणि त्यानंतरच अनुराग कश्यप संतापला आणि त्याने सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला, त्यानंतर संपूर्ण वाद सुरु झाला आला. या पोस्टमुळे त्याला माफी मागावे लागेल पण माफी मागितल्यानंतर त्याने पुन्हा एकदा नवी पोस्ट केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.