Prajakta Mali Love Life: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या एका स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीत तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल खुलेपणाने बोलत, त्यांच्या नात्याचा शेवट का झाला, हे सांगितलं. ती म्हणाली की, "तो सतत खोटं बोलायचा, त्यामुळे मी त्याच्याशी संबंध तोडले." या वक्तव्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये नक्की कोण तिचा बॉयफ्रेंड होता याबद्दल उत्सुकता वाढली असून, सोशल मीडियावरही या चर्चेला उधाण आलं आहे.
प्राजक्ताने सांगितले की, नात्यात प्रामाणिकपणा अत्यंत आवश्यक असतो. कोणतंही नातं टिकवण्यासाठी पारदर्शकता हवी असते. मात्र माझा एक्स बॉयफ्रेंड वेळोवेळी खोटं बोलायचा, आणि माझ्यावर त्याचा परिणाम होऊ लागला.' त्यामुळे तिने स्वतःसाठी हा निर्णय घेत त्याच्याशी ब्रेकअप केल्याचे ती म्हणाली.
“जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता, तेव्हा दुसऱ्याला बदलण्यापेक्षा, स्वतःसाठी काय योग्य आहे, हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं,” असंही ती पुढे म्हणाली. प्राजक्ताने तिच्या अनुभवातून शिकलेल्या गोष्टी शेअर केल्या आहेत. प्राजक्ताच्या या वक्तव्यावरून तिने स्वतःच्या भावनांना योग्य तो मान दिला आणि इतर तरुणींनाही असा निर्णय घेण्याची प्रेरणा दिली आहे.
प्राजक्ताची ही परखड आणि आत्मविश्वासपूर्ण भूमिका अनेकांना प्रेरणादायी वाटत आहे. तिचं हे धाडस आणि स्वतःसाठी घेतलेला ठाम निर्णय तिच्या चाहत्यांनीही कौतुकाने स्वीकारला आहे. सध्या ती तिच्या विविध प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असून, तिच्या आगामी कामांबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.