Saif Ali Khan: मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत सैफ अली खानचा किसिंग सीन; 'ज्वेल थीफ' मधील 'इल्जाम' गाण्यामुळे अभिनेता झाला ट्रोल

Jewel Thief: अभिनेता सैफ अली खान लवकरच 'ज्वेल थीफ' या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटातील 'इल्जाम' हे गाणं प्रदर्शित झाले आहे. पण, या गाण्यामुळे सैफ अली खान ट्रोल होत आहे.
Saif Ali Khan
Saif Ali KhanSaam Tv
Published On

Saif Ali Khan: सैफ अली खान पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे. 'ज्वेल थीफ' या नवीन ओटीटी चित्रपटातून सैफ अली खान प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या चित्रपटातील ‘इल्जाम’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या गाण्यात सैफसोबत अभिनेत्री निकिता दत्ता झळकत असून, त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

‘इल्जाम’ या गाण्यात सैफ आणि निकिता यांच्यातील हॉट आणि इंटेन्स रोमँटिक सीन पाहायला मिळतात. दोघांमधील किसिंग सीन विशेष लक्ष वेधत आहेत. हे गाणं रिलीज होताच प्रेक्षकांनी ट्रोलिंगला सुरुवात केली आहे. मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीसोबतचा किसींग सिन पाहून विविध कमेंट करत नेटकरी ट्रॉल करत आहेत. या गाण्यावर कमेंट करत एका नेटकाऱ्याने लिहिले ही अभिनेत्री साराच्या वयाची आहे ना. तर आणखी एका नेटकाऱ्याने लिहिले, सैफला २० वर्ष लहान अभिनेत्रीसोबत काम करणार होता म्हणून लवकर बारा झाला.

‘ज्वेल थीफ’ या चित्रपटात सैफ अली खान एका चोराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर निकिता दत्ता या चित्रपटातून एका महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. युट्युब आणि इंस्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे गाणं ट्रेंड करत आहे. पण या गाण्यातील किसींग सिन नेटकऱ्यांना खटकली आहे.

सैफचा परफॉर्मन्स आणि रोमँटिक सीन यामुळे 'ज्वेल थीफ' हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटाची रिलीज डेट लवकरच जाहीर होणार असून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. पण, सध्या ‘इल्जाम’ या गाण्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com