अंधेरी येथे एका बॉलिवूड अभिनेत्रींवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी हर्ष ज्योतिंद्र व्यास याला अटक करण्यात आली होती. त्याला आता मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
ओशिवरा पोलिसांनी २०२३ मध्ये हर्षला अटक केली होती. तो एका दरोड्यात सहभागी होता. त्यानंतर पाच वर्ष फरार होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, अंधेरीच्या वीरा देसाई रोडजवळील एका जीमजवळ त्याना अटक केली होती. चौकशीदरम्यान, हर्ष हा एका दरोडा टाकणाऱ्या टोळीसोबत काम करायचा, अशी कबुली दिली. जिथे रोख रक्कम, मोबाईल फोन आणि इतर मोल्यवान वस्तू चोरायचे प्रशिक्षण दिले जायते.
हर्षवर भारतीय दंड संहितेच्या IPC 376(2)(n) अंतर्गत बलातक्रा, प्राणघातक हल्ला आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. एका बॉलिवूड अभिनेत्रीने हर्षवर बलात्कार आणि मारहाणीचा आरोप केला होता.
बॉलिवूड अभिनेत्री जून २०२१ मध्ये हर्षला अंधेरीतील एका जिममध्ये भेटली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. हर्षने अभिनेत्री लग्नाचे वचनदेखील दिले होते. त्यानंतर तिच्याशी लैगिंक संबंध ठेवले. यानंतर ती प्रेग्नंट राहिली. अभिनेत्रीची इच्छा नसतानाही ती ही गर्भधारणा सुरु ठेवण्यासाठी हर्षने तिच्यावर जबरदस्ती केली. अखेर २०२२ जुलैमध्ये तिने गर्भपात केला. त्यानंतर २०२२ मध्ये ती पुन्हा प्रेग्नंट होती. तेव्हा मात्र, हर्षने तिच्याशी संबंध तोडले. तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. शेवटी २०२३ मध्ये त्यांच्यात वाद झाले. यावेळी हर्षने तिला मारहाण केली, असा आरोपी अभिनेत्रीने केला आहे.
हर्षने अभिनेत्रीकडून वर्षभरात जवळपास ९८ लाख रुपये घेतल्याचाही आरोपी तिने केला आहे. परंतु या आरोपांना हर्षने फेटाळले आहे. हर्षच्या वकीलांनी कोर्टात युक्तिवाद केली की, त्यांच्या नात्याला दोघांचीही परवानगी होती. त्यांनी लग्नदेखील केले होती. हर्षची आई दोन महिने अभिनेत्रीसोबत राहिलीदेखील होती, असे वकिलांनी सांगितले. हर्षची गुन्हेगारी वृत्ती ही अभिनेत्रीसाठी धोकादायक आहे, असे अभिनेत्रीच्या वकिलांनी सांगितले. या प्रकरणी निकाल देताना सुरुवातीच्या आरोपांमध्ये कुठेही लैगिंक संबध किंवा आर्थिक शोषण याचा उल्लेख नव्हता. त्यामुळेच त्याला जामिन मंजूर केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.