Amitabh Bachchan Interaction Session With Fans
Amitabh Bachchan Interaction Session With FansSaam Tv

Amitabh Bachchan News : बिग बींच्या बंगल्याबाहेर फॅन्सचा 'जलसा', 'प्रोजेक्ट के'चं हटके प्रमोशन

Amitabh Bachchan Surprises Fans with Project K T-Shirt : अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावरुन व्हिडिओ शेअर केला आहे.
Published on

Amitabh Bachchan Interaction Session With Fans : महानायक अमिताभ बच्चन यांनी गेली ५ दशके रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. त्यांच्या कामाचे कौतुक ना फक्त भारतात तर जगभरात होत आहे. वयाची ८० वर्ष पूर्ण करुनही अजूनही त्याच ताकदीने, उत्साहाने अमिताभ बच्चन काम करतात. त्यामुळे त्यांचं खूप कौतुक होत आहे. नुकताच त्यांनी सोशल मीडियावरुन चाहत्यांचे आभार मानत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

रविवार आणि अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगल्याचं एक खास नात आहे. बिग बी यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रत्येक रविवारी जलसा बंगल्याबाहेर गर्दी करतात. रविवार ९ जुलैला अशीच गर्दी पाहायला मिळाली. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावरुन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर तूफान चर्चा होत आहे.

Amitabh Bachchan Interaction Session With Fans
Somy Ali Salman Khan Ex Girlfriend: सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडची खळबळजनक पोस्ट; सिनेसृष्टीतील बड्या सेलिब्रिटीवर केला गंभीर आरोप

या व्हिडिओत अमिताभ बच्चन यांनी बंगल्याबाहेर जमलेल्या सर्व चाहत्यांशी संवाद साधला. चाहत्यांच्या कौतुकाचा अमिताभ बच्चन यांनी स्वीकार केला. व्हिडिओत चाहते अमिताभ बच्चन यांचे पोस्टर घेऊन उभे आहेत. अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना ऑटोग्राफही दिला. सर्वात म्हत्तवाची गोष्ट म्हणजे चाहत्यांना भेटण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी घातलेल्या टी-शर्टवर त्यांच्या आगामी चित्रपट 'प्रोजेक्ट के'चं पोस्टर होतं. चाहत्यांना भेटताना देखील त्यांनी आगामी चित्रपटाचं प्रमोशन केलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत 'जे माझ्यासाठी आलेत त्यांना खूप प्रेम...तूमच्यामुळेच आज मी इथे आहे... तूमच्या सगळ्यांसाठी माझं खूप प्रेम, आभार आणि तूमच्या या प्रेमाचा मी खूप आदर करतो'. असं कॅप्शनही दिलं आहे.

अमिताभ बच्चन हे नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. त्यांचा 'प्रोजेक्ट के' हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'प्रोजेक्ट के' या चित्रपटात प्रभास, दिपिका पदुकोन,कमल हसन,दिशा पटानी अशी स्टारकास्ट दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com