Amitabh Bachchan -KBC : 'कौन बनेगा करोडपती'च्या विजेत्या तहसीलदारला अटक, धक्कादायक कारण आलं समोर

KBC winner Amita Singh Tomar Arrested : अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या शोच्या विजेत्याला अटक करण्यात आली आहे. अडीच कोटींच्या घोटाळ्यात तहसीलदाराचे नाव आले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
KBC winner Amita Singh Tomar Arrested
Amitabh Bachchan -KBCsaam tv
Published On
Summary

'कौन बनेगा करोडपती'च्या विजेत्याला अटक झाली आहे.

विजेत्याला अडीच कोटींच्या फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

अमिताभ बच्चन यांच्या 'केबीसी'मध्ये त्यांनी तब्बल ५० लाख रुपये जिंकले होते.

बॉलिवूडचे 'बिग बी' अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती'(KBC) मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या शोमुळे अनेकांचे नशीब उजळले आहे. अनेकांनी येथे कोटी आणि लाखांची बक्षीस जिंकली आहेत. 'केबीसी'मध्ये ५० लाख रुपये जिंकणाऱ्या तहसीलदार अमिता सिंह तोमर यांना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

अमिता सिंह तोमर यांच्यावर २०२१ मध्ये पूरग्रस्तांच्या मदत निधीत कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील विजयपूर येथे अमिता सिंह तोमर या तहसीलदार होत्या. २०२१ मध्ये श्योपूर येथे पूर आला होता. त्यामुळे पूरग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकारने मोठा निधी दिला. मात्र ऑडीटमध्ये असे समजले की, २ ते २.५ कोटी रुपयांचा निधी पूरग्रस्तांऐवजी १२७ बनावट बँक खात्यांमध्ये टाकण्यात आला. निधी योग्य व्यक्तींना मिळावी यासाठी बडोदा तालुक्यातील ७९४ पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली होती.

अमिता सिंह तोमर यांना सध्या शिवपुरी येथील महिला कारागृहात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कोणताही तांत्रिक बिघाड नसून अधिकृत नोंदींमध्ये फेरफार करण्यात आली आहे. तपासात १०० हून अधिक व्यक्तींची नावे आणि दोन डझनांहून अधिक तलाठ्यांचा समावेश आहे. तसेच अमिता सिंह तोमर यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांमध्येही संशयास्पद आर्थिक व्यवहार दिसून आले आहेत.

अमिता सिंह तोमर यांना फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि भ्रष्टाचार या गुन्ह्यांतर्गत तक्रार दाखल केली आहे. अमिता सिंह तोमर यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात जामीन अर्ज सादर केला असून न्यायालयाने तो फेटाळून लावला. तसेच त्यांना आपल्या पदावरून हटवण्यात आले आहे. अमिता सिंह तोमर या ग्वाल्हेर येथे राहतात. २६ मार्च रोजी त्यांना आपल्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. अमिता सिंह तोमर यांच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणाचा पोलीस तपास घेत आहेत.

अमिता सिंह तोमर या 'कौन बनेगा करोडपती ५ 'मध्ये झळकल्या होत्या. तिथे त्यांनी ५० लाख रुपये जिंकले होते. तसेच अमिताभ बच्चन यांनी अमिता सिंह तोमर यांचे भरपूर कौतुक केले.

KBC winner Amita Singh Tomar Arrested
Famous Actor Brother Death : प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; भावानं विषारी कीटकनाशक पिऊन आयुष्य संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com