Shaheen Bhatt: आलिया भट्टच्या बहिणीचा झाला साखरपुडा, कोण आहे तिचा लाइफ पार्टनर?

Shaheen Bhatt: शाहीन भट्टने फिटनेस कोच इशान मेहरा सोबत एंगेजमेंट केली आहे. तिच्या रिंग फ्लॉन्ट करतानाच्या फोटोसोबत बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
Shaheen Bhatt
Shaheen BhattSaam tv
Published On

Shaheen Bhatt: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची बहीण शाहीन भट्ट सध्या तिच्यासोबत घडलेल्या खास गोष्टीमुळे चर्चेत आहे. शाहीनने फिटनेस कोच ईशान मेहरा सोबत साखरपुडा करणार असल्याचे सांगितले आहेत. या सुंदर क्षणांचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले असून हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये शाहीन भट्टने तिची एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करत हे आनंदी क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. साध्या पण एलिगंट स्टाईलमध्ये दिसणाऱ्या शाहीनचा हा लूक चाहत्यांना विशेष आवडला आहे. शाहीन भट्ट ही केवळ स्टार किड नव्हे, तर लेखिका म्हणूनही ओळखली जाते. मानसिक आरोग्याविषयी खुल्या मनाने बोलत तिने तिचे अनेक अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर करत असते.

Shaheen Bhatt
Virat Kohli: विराट कोहलीचं 'अल्गोरिदम' पुन्हा रडारवर! परदेशी मॉडेलचा फोटो लाईक केल्याने मीम्सचा पाऊस

शाहीन भट्टने तिच्या प्रपोजलचे फोटो शेअर करून चाहत्यांना या खास आणि इमोशनल क्षणाची झलक दाखवली आहे. फोटोंमध्ये, शाहीन तिची सुंदर एंगेजमेंट रिंग दाखवत आहे आणि इशान मेहरासोबत पोज देत आहे. या फोटोंसोबत, शाहीनने एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे, "कदाचित एकमेकांना पसंत करण्याबाबत आपण खूप पुढे गेलो."

Shaheen Bhatt
Bigg Boss Marathi 6 Winner: बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव फिनालेपूर्वीच लीक; 'हा' स्पर्धक जिंकणार ट्रॉफी!

दरम्यान, तिच्या एंगेजमेंटनंतर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी कमेंट करुन शुभेच्छा देत आहेत. आलियाने दोघांना तुम्हाला माझे खूप प्रेम म्हणत शुभेच्छा दिल्या. परिनितीने नेहमी सोबत राहा असे लिहिले. नीतू कपूर, अर्जुन कपूर, शनाया कपूर, अथिया शेट्टी, अनन्या पांडे यांनीही तिचे अभिनंदन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com