Rakhi Sawat : राखी सावंतने व्यक्त केली आई बनण्याची इच्छा; म्हणाली लग्नाआधी...,

आलियाच्या प्रेग्नेंसीची बातमी कळताच राखी सावंतला देखील आई बनण्याची इच्छा आहे.
Rakhi Sawat
Rakhi Sawat Saam TV
Published On: 

Rakhi Sawat On Pregnancy : सध्या बॉलिवूडमध्ये फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे. ती म्हणजे आलियाच्या प्रेग्नेट असल्याची. बॉलिवडू अभिनेत्री आलिया भट्टने लग्नाच्या दोन महिन्यानंतर आपण आई होणार असल्याची खूशखबर दिली. जेव्हापासून आलियाने ही गुडन्यूज शेअर केली. तेव्हापासून सगळेच तिचे अभिनंदन करत आहेत. दरम्यान, आलियाच्या प्रेग्नेंसीची बातमी कळताच राखी सावंतला देखील आई बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका व्हिडिओत राखीने आई बनण्याबाबत वक्तव्य केलं आहे. (Rakhi Sawant News)

Rakhi Sawat
Relationship Tips: अरेंज मॅरेज करताय? मग जोडीदाराला 'हे' प्रश्न आर्वजून विचारायला हवे

राखीला लग्नाआधी प्रेग्नंट व्हायचंय?

ड्रामा क्वीन राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत राखी आई बनण्याची इच्छा व्यक्त करत आहे. वास्तविक एका फोटोग्राफरने राखी सावंतला आलियाच्या गरोदरपणावर प्रतिक्रिया विचारली होती. यावर बोलताना 'मी आई कधी बनणार माझ्या आयुष्यात अशी आनंदाची बातमी कधी येणार लग्नाआधीही माझ्या आयुष्यात चांगली बातमी येऊ शकते, त्यानंतर मी लग्न करेल' असं राखी सावंतने म्हटलं.

एवढेच नाही तर राखी सावंतने तिचे बाळ कसं असणार हेही सुद्धा सांगितलं आहे. राखी म्हणाली, "हो आत्ताच घडते. मला एवढेच माहित आहे की एक दिवस मी एका शूरवीर पुत्राला जन्म देणार आहे. माझं बाळ या देशाचा तारहार असेल. जे लोकं ड्रग्ज, दारू, बलात्कार, आणि हत्या प्रकरणात फसलेले आहेत. त्यांना ते चांगला रस्ता दाखवेल. दरम्यान, राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. राखीच्या या खोडसाळपणाने नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच राखीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या घटस्फोटाची माहिती दिली होती. या पोस्टमध्ये तिनं पती रितेशपासून वेगळं होत असल्याचं म्हटलं होतं. ‘बिग बॉस १५ मधून बाहेर पडल्यानंतर बरंच काही घडून गेलं आहे. आम्ही आमचं नातं वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला मात्र आम्हाला यात अपयश आलं. अखेर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला.’ असं राखीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com