Alia Bhatt : कान्समध्ये फोटोग्राफर्सनी आलिया भट्टकडे पाहिलंच नाही, नेटकरी म्हणाले- "ऐश्वर्याची बरोबरी कोणी करूच शकत नाही..."| VIDEO

Alia Bhatt Ignored By Paparazzi At Cannes 2026 : आलिया भट्टचे कान्समधील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यातील एका व्हिडीओत फोटोग्राफर्स आलियाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
Alia Bhatt Ignored By Paparazzi At Cannes 2026
Alia BhattSAAM TV
Published On
Summary

आलिया भट्टने 'कान्स चित्रपट महोत्सव २०२६'ला हजेरी लावली.

कान्सच्या रेड कार्पेटवर आलिया भट्टकडे फोटोग्राफर्सनी दुर्लक्ष केले.

नेटकऱ्यांनी आलियाची तुलना ऐश्वर्या रायसोबत केली.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) कान्समध्ये (Cannes Film Festival 2026) आपल्या वेगवेगळ्या लूकने आणि सौंदर्याने चारचाँद लावले आहेत. तिचे व्हिडीओ आणि फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. तिच्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात आलिया भट्टने कान्सच्या रेड कार्पेटवर पीच रंगाच्या गाऊनमध्ये पोझ दिली, पण परदेशी फोटोग्राफर्सनी तिला ओळखलेही नाही आणि तिच्याकडे उघडपणे दुर्लक्ष केले. व्हिडीओत पापाराझींचे लक्ष आलियाऐवजी इतर सेलिब्रिटींवर असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

व्हिडिओंमध्ये आलिया रेड कार्पेटवर पूर्ण आत्मविश्वासाने हवेत आपला दुपट्टा फिरवत, केस सावरत येताना दिसत आहे. ती हाताने हार्ट इमोजी करत हसून पोज देताना दिसत आहे. मात्र उपस्थित फोटोग्राफर्सचे तिच्याकडे लक्ष नव्हते. कॅमेरे दुसऱ्याच एका सेलिब्रिटीवर केंद्रित होते. घडलेल्या प्रकाराकडे आलिया भट्टने दुर्लक्ष केले आणि हसत आणि पोज देत राहीली. चाहत्यांनी याचे खूप कौतुक केले. मात्र आलियाचे काही चाहते तिला अशा मिळालेल्या वागणुकीमुळे निराश झाले. तर काहींनी तिची तुलना ऐश्वर्या रायसोबत केली.

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

एका युजरने लिहिलं की, "तिथे असलेले प्रत्येक फोटोग्राफर आलियाकडे दुर्लक्ष करत आहेत." दुसऱ्या युझरने लिहिले, "कॅमेरामन तिचे फोटो काढत नाहीत..." आणखी एका युझरने विचारले, "कॅमेरामन तिच्याकडे दुर्लक्ष का करत आहेत?" तर आणखी एका नेटकऱ्यांने लिहिलं की, "आलिया तिथे आहे याची कोणाला पर्वा सुद्धा नाही..." सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका नेटकऱ्यांने लिहिले की, "ऐश्वर्याच्या सौंदर्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही."

"तिचे फोटो काढण्यात कोणालाही रस नाही...", "हा खूप मोठा अपमान आहे...", "ऐश्वर्या रायमध्ये अशी जादू आहे जी इतर कोणाकडेही नाही...", "ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे...", "ऐश्वर्या रायची जागा कोणीही घेऊ शकत नाही, ती सर्वोत्तम आहे." अशा कमेंट्सचा वर्षाव व्हायरल व्हिडीओंवर पाहायला मिळत आहे.

Alia Bhatt Ignored By Paparazzi At Cannes 2026
Famous Actor Death : ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन; वयाच्या ७१ व्या वर्षी मालवली प्राणज्योत, मनोरंजन विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com