८ वीची मुलं शाळेत करतात 'निंबुडा निंबुडा'चा अभ्यास; पुस्तकात चक्क ऐश्वर्या रायचं अख्खं गाणं छापलं, मोठा वाद उफाळला

Nimbooda Nimbooda: ओडिशाच्या आठवीच्या कला शिक्षणाच्या पुस्तकात 'निंबूडा-निंबूडा' आणि 'रिंद पोश माल' गाण्यांचा समावेश केल्याने वाद निर्माण झाला आहे. स्थानिक संस्कृतीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.
Nimbooda Nimbooda
Nimbooda NimboodaSaam Tv
Published On

Nimbooda Nimbooda: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ओडिशातील नवीन शालेय पाठ्यपुस्तकांभोवतीचा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी या पुस्तकांमध्ये तब्बल 1,678 त्रुटी आढळल्याची चर्चा सुरू असतानाच आता इयत्ता आठवीच्या 'कृती' या कला विषयाच्या पुस्तकातील धड्यावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकात लोकप्रिय बॉलीवूड गाण्यांचा समावेश केल्याने शिक्षक, पालक आणि नेटकरी अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.

इयत्ता आठवीच्या 'मो संगीत जगत' (माझे संगीताचे जग) या प्रकरणामध्ये राजस्थानी लोकगीत 'निंबूडा-निंबूडा' याचे संपूर्ण बोल देण्यात आले आहेत. हे गाणे मूळचे लोकगीत असले, तरी 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटामुळे ते देशभरात लोकप्रिय झाले. याशिवाय 'मिशन काश्मीर' चित्रपटातून प्रसिद्ध झालेले 'रिंद पोश माल' या गाण्याचाही समावेश या धड्यात करण्यात आला आहे.

Nimbooda Nimbooda
Jasmin Bhasin: प्रसिद्ध अभिनेत्रीला बर्थडे ट्रिप पडली महागात; दुबईत अचानक प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात हलवलं

यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की, ओडिशाच्या विद्यार्थ्यांना राज्यातील ओडिया लोकगीते, पारंपरिक संगीत किंवा शास्त्रीय वारशाची माहिती देण्याऐवजी बॉलीवूडमुळे प्रसिद्ध झालेल्या गाण्यांना अभ्यासक्रमात स्थान का देण्यात आले? स्थानिक संस्कृती आणि कलापरंपरेला प्राधान्य देण्याची मागणी अनेकांनी केली आहे. या मुद्द्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्सही व्हायरल होत आहेत.

Nimbooda Nimbooda
Eetha controversy: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'वर विठाबाईंच्या कुटुंबीयांची नाराजी; नाव बदला, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा

याआधी नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये एकूण 1,678 त्रुटी असल्याचे समोर आले होते. या प्रकरणानंतर शिक्षक, पालक आणि विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या निर्देशानुसार चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर SCERT चे माजी संचालक मनोज पाढी यांच्यासह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले, तर आणखी सहा अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी समितीने भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी 14 महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत. यामध्ये 'मास्टर इरॅटा रजिस्टर' तयार करणे, विद्यार्थ्यांपर्यंत दुरुस्त्यांची माहिती वेळेत पोहोचवणे आणि पाठ्यपुस्तकांचे सखोल परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र क्वालिटी अॅश्युरन्स सेल स्थापन करण्याचा समावेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com