Aditya Roy Kapoor On Relationship: अनन्या पांडेसोबतच्या स्पेनमधील फोटोंवर आदित्य कपूरनं सोडलं मौन, म्हणाला, “सोशल मीडियावर...”

Aditya Roy Kapoor Interview: आदित्य- अनन्याचे स्पेनमधील रोमँटिक फोटो व्हायरल झाले होते. अशातच त्या रोमँटिक फोटोंवर अभिनेता आदित्य रॉय कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.
Aditya Roy Kapoor On Relationship
Aditya Roy Kapoor On RelationshipInstagram
Published On

Aditya Roy Kapoor News: अभिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या गेल्या काही दिवसांपासून रिलेशनची चर्चा सुरू आहे. अनेक दिवसांपासून यांचे अफेअर सुरू असल्याची चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आदित्य- अनन्याचे स्पेनमधील रोमँटिक फोटो व्हायरल झाले होते. अशातच त्या रोमँटिक फोटोंवर अभिनेता आदित्य रॉय कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.

Aditya Roy Kapoor On Relationship
Nitin Desai News: नितीन देसाईंनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तू फॉरेन्सिक लॅबकडे, लवकरच उलगडा होणार

एका इंग्रजी वेबसाईटला आदित्यने मुलाखत दिली आहे. मुलाखतीत अभिनेत्याला त्याच्या आणि अनन्याच्या व्हायरल झालेल्या फोटोंबद्दल प्रश्न विचारला होता. यावेळी अभिनेत्याने सांगितले, “मी सहसा जास्त सोशल मीडियावर सक्रिय नसतो, माझ्यासाठी फार चांगली गोष्ट आहे. मला जरा माझ्या कामातून वेळ हवा होता, त्यासाठी मी सुट्टीसाठी बाहेर गेलो होतो. सुट्टीचा आनंद लुटत असताना मी मुंबईतल्या पावसाला खूपच मिस केलं. सुट्टी मस्त पैकी एन्जॉय करून आल्यानंतर मुंबईत गेल्या आठवड्याभारापासून पाऊस पडतोय.” अभिनेत्याने दिलेल्या या उत्तराची सध्या सर्वत्र कमालीची चर्चा सुरू आहे.

अनेकदा आदित्य आणि अनन्या हे दोघेही माध्यमांसमोर एकत्र स्पॉट झाले. अनेकदा स्क्रिनिंग असो किंवा डिनर पार्टी असो अनेकदा हे दोघेही एकत्र स्पॉट झाले आहेत. स्पेनमधील सुट्टी एन्जॉय केल्यानंतर अनन्या- आदित्य पुन्हा एकदा मुंबईत एकत्र स्पॉट झाले. यावेळी हे दोघेही ‘बार्बी’ चित्रपट पाहायला गेले असताना, ते स्पॉट झाले. यावेळी दोघांच्या ही लुकची बरीच चर्चा झाली. आदित्यने यावेळी पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता, तर अनन्याने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता.

Aditya Roy Kapoor On Relationship
Nitin Desai Death Update : नितीन देसाईंना कोण त्रास देत होतं, ते ४ जण कोण? अखेरच्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?

आदित्य आणि अनन्याच्या रिलेशनची जेव्हा पासून चर्चा होतेय, तेव्हापासून अनेकदा त्यांनी एकत्र पार्टीला हजेरी लावली होती. आदित्य- अनन्या दोघेही क्रिती सेननने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीमध्येही एकत्र स्पॉट झाले होते. सोबतच त्यानंतर देखील ही जोडी मनीष मल्होत्राच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये देखील एकत्र रॅम्प वॉक करताना दिसले होते. फिफा वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये दोघांना एकत्र पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनची चर्चा सुरू झाली होती.

Aditya Roy Kapoor On Relationship
Ranveer Singh Dance Video: रणवीरने ९३ वर्षांच्या आजोबांसोबत धरला जबरदस्त ठेका, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची भन्नाट कमेंट

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, येत्या २५ ऑगस्टला ती आणि आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत असलेले ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर आदित्य रॉय कपूरचा आणि सारा अली खानचा ‘मेट्रो इन दिनो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com