Adipurush 1st Day Collection: 'लोकल'ला झटका, ग्लोबलला दणका; 'आदिपुरूष'नं सर्व रेकॉर्ड मोडले, चित्रपटाबाबत असं काय घडलं?

Adipurush Box Office Collection: प्रभास, क्रिती सेनन स्टारर या चित्रपटाने बॉक्स ऑफिस दमदार कामगिरी केली आहे.
Adipurush Crossed 100 Crore
Adipurush Crossed 100 CroreInstagram @actorprabhas
Published On: 

Adipurush Crossed 100 Crore : ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला. अनेक वाद आणि वादानंतर चित्रपटात बदल करून निर्माते आणि दिग्दर्शकांनी आदिपुरुष प्रेक्षकांसमोर आणला. चित्रपटासाठी प्रेक्षक देखील खूप उत्सुक होते. त्यांचा तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे.

चित्रपटाचे संवाद, व्हीएफएक्स, पात्रांचे लूक, कथा यावरून अनेक वाद झाले. असे असले तरी आदिपुरुष चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग देखील दमदार झाली होती. तर प्रभास, क्रिती सेनन स्टारर या चित्रपटाने बॉक्स ऑफिस दमदार कामगिरी केली आहे. आदिपुरुष चित्रपटाचे पहिल्या दिवशी कलेक्शन किती झाले आहे याचा रिपोर्ट जाहीर झाला आहे. चला तर मग नजर टाकूया चित्रपटाच्या कलेक्शनवर. (Latest Entertainment News)

Adipurush Crossed 100 Crore
Aathvani New Marathi Movie: पत्रातून उलगडणार दोन पिढ्यांची प्रेमकथा; सुहास जोशी-मोहन आगाशे यांच्या 'आठवणी'चा टीजर प्रदर्शित

१६ जून रोजी आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चित्रपटाला तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. चित्रपट भारतातात पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला तसेच हा चित्रपट परदेशात देखील प्रदर्शित झाला आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशात प्री- बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

आदिपुरुष चित्रपटाच्या कलेक्शनबाबत अहवाल जाहीर झाला आहे. अहवालातील माहितीनुसार आदिपुरुष चित्रपटाने जगभरात पहिल्या दिवशी १४० करोडची कमाई केली आहे. ही रेकॉर्ड ब्रेक ओपनिंग आहे. 'पठान' चित्रपटाचा रेकॉर्ड आदिपुरुष चित्रपटाने मोडला आहे. पहिल्या दिवशी पठान चित्रपटाने १०६ कोटींची कमाई केली होती.

आदिपुरुष चित्रपटाच्या ऑफिशल सोशल मीडियावरून देखील ही माहिती शेअर करण्यात आली आहे. तर या चित्रपटाने फक्त हिंदीमध्ये ३७. २५ जातींची कमाई केली आहे.

प्रभास, क्रिती सेनन स्टारर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उताराला आहे. प्रेक्षक विविध पद्धतीने चित्रपटवरील त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत. यामुळेच चित्रपट आणखी अनेक विक्रम करून शकतो. तसेच चित्रपटाचे विक्रमी कलेक्शन होईल यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com