तेव्हा बोलली अन् आता भोवलं; राखी सावंत विरोधात पोलिसात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Police Complaint Against Rakhi Sawant
Police Complaint Against Rakhi Sawant Saam TV
Published On

संजय गडदे

अभिनेत्री राखी सावंत विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने राखी सावंत विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. 'मी टू' प्रकरणात राखी सावंतने नाना पाटेकर यांची बाजू घेत तनुश्री दत्ता हिच्यावर अभद्र भाषेत टीका केली होती.

यानंतर तनुश्री दत्ता आणि राखी सावंत यांच्यात शाब्दिक वाद देखील झाले होते. दोन दिवसांपूर्वी तनुश्री दत्ताने वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. अखेरीस ओशिवरा पोलिसांनी आज तनुश्री दत्ताची राखी सावंत विरोधातील तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता राखी सावंतच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com