Payel Mukherjee Attacked : डोळ्यांत पाणी, चेहऱ्यावर भीती; हल्ल्याची घटना सांगताना अभिनेत्री रडली, VIDEO केला शेअर

Actress Payel Mukherjee : बंगाली अभिनेत्री पायल मुखर्जी हिच्यावर पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे हल्ला करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ शेअर करत घडलेला भयंकर प्रसंग सांगितला.
Payel Mukherjee Attacked in kolkata
Payel Mukherjee Attacked in kolkatasaam tv
Published On

कोलकातामध्ये अभिनेत्री पायल मुखर्जी हिच्यावर हल्ला (Actress Payel Mukherjee) करण्यात आला आहे. या घटनेनंतर भाजपने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधला आहे.

कोलकाता अत्याचार प्रकरणानंतर जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. सत्ताधारी आणि विरोधकही या घटनेवरून भिडले आहेत. भाजपने ममता सरकारवर हल्लाबोल केला आहे. बंगाल आता महिलांसाठी सुरक्षित राहिलेले नाही. येथील महिला, बहिणी, मुली सुरक्षित नाहीत, असे भाजपचे म्हणणे आहे.

बंगालमधील भाजप नेते दिलीप घोषण यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. या राज्यातील महिला, मुली सुरक्षित नाहीत, असे ते म्हणाले.

बंगालमध्ये गुन्हेगारांना आश्रय दिला जातो- घोष

दिलीप घोष यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. गुन्हेगार भय उरलेले नाही. पडद्याआडून ममता बॅनर्जी या गुन्हेगारांना आश्रय देतात, असा आरोप घोष यांनी केला.

कोलकाताच्या दक्षिण एव्हेन्यूसारख्या उच्चभ्रू परिसरात कारची तोडफोड होते. महिलांवर हल्ल्यासारख्या घटना होतात. कल्पना करा की ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल, असाही उल्लेख घोष यांनी केला.

Payel Mukherjee Attacked in kolkata
Don 3 Movie: रणवीर सिंगच्या 'डॉन 3'मध्ये नव्या अभिनेत्रीची एन्ट्री; आयटम साँगने प्रेक्षकांची झोप उडवणार

पायल मुखर्जीने स्वतः व्हिडिओ शेअर करत सत्य घटना समोर आणली. त्यामुळे पायलचे आभार, असेही घोष यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनीही ममता सरकारला लक्ष्य केलं. कोलकातामधील उच्चभ्रू परिसरातही महिला सुरक्षित नाहीत, असे रॉय म्हणाले.

Payel Mukherjee Attacked in kolkata
Big Boss Marathi-5: वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना डीपीने टोचले निक्कीचे कान, व्हिडिओ व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com