Actor House Robbery: प्रसिद्ध अभिनेत्याचं मुंबईतील घर फोडलं; चोरट्यांनी १.२६ कोटींचा मुद्देमाल चोरला, परिसरात खळबळ

Actor House Robbery Mumbai: अभिनेता-निर्माता अभिमन्यू सिंग याच्या अंधेरीतील घर चोरट्यांनी फोडलं आहे. ओशिवरा पोलिसांनी उलगडा केला असून सराईत गुन्हेगाराकडून १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
actor producer Abhimanyu Singh house in Andheri was Robbery
actor producer Abhimanyu Singh house in Andheri was RobberySaam Tv
Published On

Actor House Robbery: अभिनेता आणि निर्माता अभिमन्यू सिंग यांच्या अंधेरी (पश्चिम) येथील घरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा ओशिवरा पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सोन्या-हिऱ्यांचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १.२६ कोटी रुपयांचा मालमत्ता जप्त करण्यात आला आहे. गुन्हे प्रकटीकरण पथक आणि ओशिवरा पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे ही मोठी कारवाई शक्य झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ डिसेंबर २०२५ च्या रात्री ते ३० डिसेंबर २०२५ च्या सकाळदरम्यान अंधेरी (पश्चिम) येथील लोखंडवाला परिसरातील हाय क्लास सोसायटीतील इमारतीतीत अभिमन्यू सिंग यांच्या फ्लॅटला टार्गेट करून घरफोडी करण्यात आली होती. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात आरोपीने फ्लॅटमध्ये घुसखोरी करत सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केले.

actor producer Abhimanyu Singh house in Andheri was Robbery
Film Director Death: प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताची ओळख पटवण्यात आली. पाठपुराव्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्यावर मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत एकूण १४ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

actor producer Abhimanyu Singh house in Andheri was Robbery
Skin Hair Care: थंडीत त्वचा कोरडी आणि केस निस्तेज झालेत? मग, वापरून पाहा 'हा' सोपा घरगुती उपाय

अटकेनंतर आरोपीकडून चोरीस गेलेला सुमारे १.२६ कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली. या कारवाईमुळे अभिमन्यू सिंग यांच्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा झाला असून, आरोपीच्या चौकशीतून आणखी काही घरफोडी प्रकरणांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सध्या या प्रकरणाचा पुढील तपास ओशिवरा पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. हाय प्रोफाईल भागातील घरफोड्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवण्यासह तांत्रिक साधनांचा अधिक वापर करण्याचे संकेत दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com