Abhijeet - Nikki Fight
Bigg Boss MarathiSAAM TV

Bigg Boss Marathi : 'गेममध्ये लोकांच्या भावनांचा खेळ केलाय'...अभिजीतचा निक्कीवर का उडाला भडका?

Abhijeet - Nikki Fight : बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा राडा पाहायला मिळणार आहे. अभिजीत आणि निक्कीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे. आता त्यांच्या मैत्रीत फूट पडेल का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.
Published on

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi ) चा खेळ आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे स्पर्धकांमध्ये देखील गेम जिंकण्याची चढाओढ पाहायला मिळत आहे. प्रत्येक सदस्य आपला खेळ मस्त खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. तसेच यंदाचा सीझन हा भांडणांमुळे खूप गाजला आहे. या घरात प्रत्येक दिवशी नवीन राडा पाहायला मिळाला आहे.

बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, घरात निक्की (Nikki Tamboli ) आणि अभिजीत कडाक्याचे भांडण झाले आहे. अभिजीत (Abhijeet Sawant) निक्कीला खूप सुनावत आहे. निक्की आरडाओरडा करत अभिजीतला म्हणते की, "अभिजीतच्या चाहत्यांची इच्छा होती तो कॅप्टन बनावा. पण त्याने अंकिताला कॅप्टन बनवलं." त्यावर निक्कीला उत्तर देत अभिजीत म्हणतोय की, "आमच्यात लोकशाही आहे तर तुमच्यात हुकुमशाही होती. तुम्ही खेळातही लोकांच्या भावनांचा खेळ केलात." अशा कठोर शब्दात अभिजीत बोला. यावर पुढे निक्की आरडाओरड करत म्हणाली की, "सटकवली आहेस तू माझी आता, हाय हाय झालीये मी...हे सगळं करून तुला मला वाईट ठरवायचं असेल तर आजपासून माझ्यासोबत बोलू नको."

गेल्या आठवड्यात संग्राम आणि अरबाज घराबाहेर गेले आणि या आठवड्यात घरातील सर्व सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले आहे. आता अभिजीत निक्कीच्या मैत्रीचं काय होणार? तसेच बिग बॉसची ट्रॉफी कोण घेऊन जाणार? बिग बॉसच्या घरातून कोण नॉमिनेट होणार ? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

Abhijeet - Nikki Fight
Arbaaz Patel : अरबाज म्हणतोय निक्की माझा कम्फर्टझोन, गर्लफ्रेंडसोबतच्या नात्यावर मौन सोडलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com