Breaking News

Abeer Gulal Serial: श्री पुन्हा अडकणार संकटात, शुभ्राचा कट यशस्वी; 'अबीर गुलाल' मालिकेत नवा ट्विस्ट

Abeer Gulal Serial Twist: ‘अबीर गुलाल’ मालिकेचा नवीन प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये मालिकेत आणखी एक रोमांचक वळण आले आहे.
Abeer Gulal Serial
Abeer Gulal SerialSaam Tv
Published On: 

कलर्स मराठीवरील अबीर गुलाल ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. या मालिकेत रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. नुकतंच मालिकेमध्ये नवा वळण आलेलं दिसतंय.

नुकताच कलर्स मराठीने ‘अबीर गुलाल’ मालिकेचा नवीन प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये मालिकेत आणखी एक रोमांचक वळण आले आहे. श्रीने आपल्या कुटुंबाचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी शुभ्राच्या खोट्या खेळींचा पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला असतानाच, शुभ्राचे कारस्थान अजूनही सुरुच आहे.

Abeer Gulal Serial
Durga Serial: दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा? मालिकेमध्ये नेमकं असं काय घडणार?

शुभ्राने विशालला पैसे देऊन अगस्त्य आणि श्रीला मारण्याचा कट आखल्याचे विशूला समजले होते आणि त्याने श्रीला याबाबत सांगण्यासाठी भेटायला बोलावले होते. मात्र, शुभ्राने आपल्या चतुराईने, विशूवर हल्ला करण्याचा कट रचला. या हल्ल्याचा संशय आता श्रीवर आला असून, श्रीला संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे.

शुभ्राच्या या नवीन योजनेमुळे श्रीची अवस्था अजूनच बिकट झाली आहे. श्रीवर आलेल्या या नव्या संकटामुळे ती कुटुंबाचा विश्वास पुन्हा मिळवू शकणार का? श्री अखेर शुभ्राला हरवू शकेल का? हे पाहणे आजच्या भागात महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com