Durga Serial
Durga SerialSaam Tv

Durga Serial: दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा? मालिकेमध्ये नेमकं असं काय घडणार?

Durga Serial Update: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘दुर्गा’मध्ये एक मोठा ट्विस्ट आला आहे. अभिषेक आणि दुर्गाच्या नात्यामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे.
Published on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘दुर्गा’मध्ये एक मोठा ट्विस्ट आला आहे. अभिषेक आणि दुर्गाच्या नात्यामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. दुर्गाचा भूतकाळ अभिषेक समोर आला असून, दुर्गा अभिषेकच्या वडिलांवर सूड उगवण्याच्या तयारीत असल्याचं कळल्यामुळे अभिषेक संतापला आहे. या गोष्टीमुळे तो दुर्गाशी त्याचं नातं संपवण्याचा निर्णय घेतो.

Durga Serial
New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

मात्र, दुर्गा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते आणि एका डायरीचा उल्लेख करते. ती अभिषेकला म्हणते, “सर्व गोष्टींचं सत्य त्या डायरीत आहे, एकदा तरी वाच.” आता अभिषेक ती डायरी वाचणार का? त्या डायरीत नक्की काय आहे? दुर्गाची बाजू अभिषेक समजून घेणार का?

'दुर्गा' ही मालिका आता एका टर्निंग पॉईंटवर येऊन ठेपली आहे. दुर्गाच्या खरं रूप समोर आल्यानंतर अभिषेकच्या नात्यावर काय परिणाम होईल? अभिषेकला सत्य खरच माहिती आहे का? तो दुर्गाला आपलेसे करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com