Kamal Sadanah News: अभिनेत्यासमोर वडिलांनी आई आणि बहिणीवर झाडल्या गोळ्या, अनेक वर्षांनंतर खुद्द अभिनेत्याने सांगितली आपबीती

Kamal Sadanah Interview: कमलच्या वाढदिवशी अशी घटना घडली की तो केव्हाच विसरू शकत नाही. ती घटना अभिनेत्याने एका मुलाखतीमध्ये सांगितली आहे. यावेळी अभिनेत्याला त्या भीषण अपघातातून सावरायला खूप वेळ लागल्याचे त्याने सांगितले.
Kamal Sadanah Interview
Kamal Sadanah Emotional RevealsSaam Tv
Published On

Kamal Sadanah Emotional Reveals

१९९२ मध्ये रिलीज झालेल्या ‘बेखुदी’ चित्रपटातून अभिनेता कमल सदानाने बॉलिवूड पदार्पण केले होते. त्याच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री काजोल देवगण होती. ‘बेखुदी’नंतर कमल दिव्या भारतीसोबत ‘रंग’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट त्याच्या सिनेकारकिर्दित सुपरहिट ठरला होता. कमलने आपल्या करिअरमध्ये मोजकेच चित्रपट दिले आहेत. कमलचे वैयक्तिक आयुष्यही चढ-उतारांनी भरलेले होते. कमलच्या वाढदिवशी अशी घटना घडली की तो केव्हाच विसरू शकत नाही. ती घटना अभिनेत्याने एका मुलाखतीमध्ये सांगितली आहे. यावेळी अभिनेत्याला त्या भीषण अपघातातून सावरायला खूप वेळ लागल्याचे त्याने सांगितले. (Bollywood)

Kamal Sadanah Interview
Juna Furniture Trailer: ‘या म्हाताऱ्याला अडवून दाखवाच !’; ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणाऱ्या ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

नुकतंच अभिनेत्याने सिद्धार्थ कन्ननला एक मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या परिवाराबद्दल काही खुलासे केलेले आहेत. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने सांगितले की, “माझा २० वा वाढदिवस होता. त्या रात्री माझ्या डोळ्यासमोर माझे वडील ब्रिज सदना यांनी माझी आई, बहिण आणि मला गोळ्या घातल्या आणि नंतर स्वत:वर गोळी झाडत स्वत:चेही त्यांनी आयुष्य संपवले. मी लगेचच माझ्या आईला आणि बहिणीला हॉस्पिटलमध्ये नेले, पण त्यांना ॲडमिट करण्यापूर्वीच त्यांचेही निधन झाले. माझ्याही मानेवर गोळी लागली होती. पण मी सुदैवाने वाचलो. या संपूर्ण घटनेनंतर मला खूप मानसिक त्रास झाला. माझ्या डोळ्यासमोरच माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. ”  (Films)

“गोळी माझ्या मानेच्या एका बाजूने घुसली आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडली. पण मी सुदैवाने वाचलो. माझ्या मानेतून गोळी बाहेर आल्यामुळे कदाचित मी वाचलो असेल. माझ्या वडिलांनी ज्यावेळी अंदाधुंद गोळीबार केला त्यावेळी ते दारूच्या नशेत होते. माझ्या वाढदिवशीच ही घटना घडली म्हणजे, माझे बालपण किंवा कुटुंब वाईट होते, असे नाही. माझे वडील वाईट व्यक्ती होते, पण त्यांचं व्यक्तिमत्व तसं नव्हतं. जेव्हा वडिलांनी आई आणि बहिणीसह मला गोळ्या झाडल्या, तेव्हा मी दोघांनाही हॉस्पिटलमध्ये नेले. पण त्यांना नेत असताना, मलाही गोळी लागली हे मलाच माहित नव्हतं.” (Bollywood News)

Kamal Sadanah Interview
Satish Kaushik Birth Anniversary: सतीश कौशिक यांना ‘बॉलिवूडचा कॅलेंडर’ का म्हणायचे?, जाणून घ्या किस्सा

“ज्या हॉस्पिटलमध्ये आईला आणि बहिणीला ॲडमिट केलं होतं, त्या हॉस्पिटलमध्ये एकही बेड रिकामा नव्हता, म्हणून माझ्या मित्राने मला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेले. माझं आई, वडिल आणि बहिणीकडे लक्ष्य होतं. डॉक्टरांना आईकडे आणि बहिणीकडे विशेष लक्ष द्यायला सांगितले होते. पण त्यांचा काही जीव वाचला नाही. मला मानेला गोळी लागल्यामुळे माझ्यावरही शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रिया करून मी घरी आल्यानंतर आईचे, वडीलांचे आणि बहिणीचे निधन झाल्याचे मला कळले. तिघांचेही पार्थिव माझ्या डोळ्यासमोर होते. माझ्या वाढदिवशी ही घटना कायमच डोळ्यासमोर येतेच. आजही हा भयानक दिवस आठवला की, माझ्या वडिलांनी असे का केले ? असा प्रश्न कायमच मला पडतो.” (Entertainment News)

Kamal Sadanah Interview
Madness Machayenge Show : हेमांगी कवी, कुशल बद्रिकेनंतर ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये एन्ट्री, टीझर VIRAL

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com