"ते फक्त वडील नव्हते, माझे मार्गदर्शक होते"; डॉ. विजय डी. पाटील यांनी जागवल्या भावुक आठवणी

Padma Shri Dr. D. Y. Patil: डॉ. विजय डी. पाटील यांनी आपले वडील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. त्यांनी आपल्या वडिलांना मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि मूल्यांचा अखंड स्रोत असल्याचे सांगत त्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे नमूद केले
Padma Shri Dr. D. Y. Pati
Published On

शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक आणि क्रीडाप्रेमी नेते डॉ. विजय डी. पाटील यांनी आपले वडील, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अत्यंत भावूक आणि आदरांजली अर्पण केली आहे. नवी मुंबई व पुणे येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष आणि कुलपती म्हणून जबाबदारी सांभाळताना, डॉ. विजय पाटील यांनी आपल्या वडिलांनी दाखवलेल्या मार्गावर चालत शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्राचा यशस्वी विस्तार केला आहे.

आपल्या वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा देताना डॉ. विजय डी. पाटील म्हणाले की, "माझे वडील केवळ एक महान व्यक्तिमत्त्व नव्हते, तर ते माझे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि मूल्यांचा अखंड स्रोत होते. त्यांनी समाजासाठी, शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांनी पेरलेली सामाजिक बांधिलकीची आणि सेवेची बीजे आज मोठ्या वटवृक्षाच्या रूपात उभी आहेत."

वडिलांच्या निधनानंतरचे अंतिम दर्शन आणि त्यांच्या जीवनप्रवासातील सोनेरी क्षणांचे स्मरण करताना डॉ. विजय पाटील अत्यंत भावूक झाले. वडिलांच्या प्रेमाची, आशीर्वादाची आणि संस्कारांची सावली नेहमीच पाठीशी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. विजय डी. पाटील यांनी पुढे सांगितले की, "वडिलांनी क्रीडा, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात समाजाला नवी दिशा दिली. त्यांचे हे विचार, स्वप्ने आणि समाजसेवेचे व्रत अधिक सक्षमपणे पुढे नेणे हीच त्यांना दिलेली खरी आणि खरीखुरी श्रद्धांजली ठरेल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com