शाळेच्या टॉयलेटमध्ये तिसरीतल्या मुलीवर बलात्कार, प्रायव्हेट पार्टला जखमा, मुलीनेच केली मदत

यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत तिसरीत शिकणाऱ्या ८ वर्षांच्या मुलीवर वर्गातीलच अल्पवयीन मुलाकडून शाळेच्या टॉयलेटमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
Zp School
Zp SchoolSaam tv
Published On
Summary
  • यवतमाळ ZP शाळेत तिसरीतल्या मुलीवर टॉयलेटमध्ये बलात्कार, दोघे अल्पवयीन ताब्यात

  • धक्कादायक! शाळेच्या टॉयलेटमध्ये ८ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, प्रायव्हेट पार्टला गंभीर जखमा

  • यवतमाळ जिल्हा परिषद शाळेत बलात्कारप्रकरण, मुलीनेच आरोपीला मदत केली

संजय राठोड, यवतमाळ प्रतिनिधी

यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत वर्गातील मुलीनेच मुलाला मदत केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलगा अन् मदत करणाऱ्या मुलीला अटक करण्यात आली असून बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या धक्कादायक घटनेमुळे यवतमाळमध्ये खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी इयत्ता तिसरीत शिकते; आरोपी मुलगा आणि मदत करणारी मुलगी हे दोघेही त्याच वर्गातील आहेत.

यवतमाळमधील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीतील मुलीवर तिच्याच वर्गातील मुलाने बाथरूममध्ये नेऊन अत्याचार केला. हे कृत्य करण्यात एका मुलीनेही त्याला मदत केली. ही घटना १ ऑगस्ट रोजी दुपारी बाभूळगाव तालुक्यातील एका गावात घडली. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात विधीसंघर्षग्रस्त मुलगा आणि मुलगी या दोघांविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.

Zp School
मोठी बातमी! राज्यात १५ हजार पोलिसांची पदं भरणार, आजच्या कॅबिनेटमध्ये ४ मोठे निर्णय!

एकाच गावातील आणि एकाच वर्गात शिकणाऱ्या इयत्ता तिसरीतील नऊ वर्षांच्या मुलाने व मुलीने केलेले कृत्य ऐकून सर्वांनाच हादरा बसला. पीडित मुलीला लघवीच्या जागेवर जखम झाल्याने तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. आईने बाभूळगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या संवेदनशील प्रकरणाचा तपास करीत पोलिसांनी पीडित मुलीच्या जबाबावरून पॉक्सोन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यातील मुलाला यवतमाळ येथील बाल निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे, तर मुलीला अमरावती येथील बाल निरीक्षणगृहात ठेवले आहे. पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती बाभूळगाव ठाणेदार लहुजी तावरे यांनी दिली.

Zp School
दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं, भाजप नेत्याची कार्यलयातच हत्या, भिवंडीत रात्री ११ वाजता काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com