
पिंपरी चिंचवडमध्ये कोयत्याने सपासप वार करत तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी ग्रँड हॉटेलसमोर ही घटना घडली. ज्ञानेश्वर उर्फ माऊली बर्गे (३९ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी पोलसांनी ५ जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरामधील मोशी ग्रँड हॉटेलसमोर ज्ञानेश्वर उर्फ माऊली बर्गे या तरुणावर ५ जणांनी जीवघेणा हल्ला केला. कोयत्याने सपासप वार करत या ज्ञानेश्वरची हत्या करण्यात आली. ज्ञानेश्वरचे आपल्याच गावातील काही लोकांशी आर्थिक संबंध होते. या आर्थिक संबंधाच्या वादातूनच त्याची हत्या करण्यात आली.
पाच आरोपींनी मिळून ज्ञानेश्वर बर्गेची धारदार कोयत्याने वार करत हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पाचही आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेत अवघ्या काही तासांत त्यांना बेड्या ठोकल्या. अशोक महाळस्कर, रोहन महाळस्कर, प्रसाद महाळस्कर, अमोल निरे आणि संकेत जेद या ५ आरोपींना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.