Crime News: नवऱ्याचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध; कंटाळून पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

Ulhasnagar Crime News: उल्हासनगरमध्ये एक विचित्र घटना समोर घडलीय. एका महिलेने पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून स्वत: जीवन संपवलं आहे. याप्रकरणात पोलिसांनी आत्महत्याची गुन्हा नोंदवलाय.
Ulhasnagar Crime News
Ulhasnagar Crime News

(अजय दुधाणे -- उल्हासनगर)

Woman killed herself For husband Extramarital Affiars :

विवाहबाह्य संबंधाचे प्रकार वाढू लागलेत. विवाहबाह्य संबंधामुळे हत्येच्या घटनेतही वाढ झालीय. उल्हासनगरमध्येही अशीच एक घटना घडलीय. या घटनेत पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून एका महिलेने स्वत: चं जीवन संपवलंय. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Latest News)

ही घटना उल्हासनगरमधील सुभाष टेकडी परिसरात घडलीय. येथील एका महिलेने नवऱ्याच्या अनेक महिलांशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केलीय. या महिलेचं सहा वर्षांपूर्वी निशांत शिंगारे व्यक्तीशी लग्न झाले होते. त्यांचे लग्न हे विधिवत झालेले असतानासुद्धा निशांत शिंगारे याने लक्ष्मीचे कोणत्याही कागदपत्रांवर नाव बदलले नव्हते.

लग्नाच्या काही दिवसानंतर निशांतचे खरे रुप महिलेला दिसू लागले निशांतचे अनेक महिलांबरोबर अनैतिक संबंध असल्याचे त्या महिलेला कळाले. त्यानंतर या गोष्टींवर या दोघांमध्ये सतत भांडणं होत होती. त्यांच्या भांडणांचे प्रकरण विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनपर्यंत पोचले होते. मात्र काही केल्या निशांत सुधरत नव्हता.

अनेक महिलांबरोबर असलेल्या संबंधाच्या कारणास्तव शनिवारी दुपारी पतीने आपल्या राहत्या घरात फाशी लावून जीवन संपविले.याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात असलेल्या रामजी आंबेडकर नगरमध्ये या घटनेने हळहळ व्यक्त केले जात आहे.

अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून माजी सैनिकाची हत्या

नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून एका माजी सैनिकाची हत्या झाली होती. ही घटना रविवारी १० मार्च रात्रीच्या सुमारास घडली होती. या अमोल काठे असं मृताचे नाव होतं. ही घटना शहरातील महामार्ग पार्क येथे घडली. याप्रकरणात चेतन नावाच्या व्यक्ती अटक करण्यात आलीय. या घटनेत अमोल काठे यांचा भाऊ कुंदन गंभीर जखमी झाला होता. चेतनच्या पत्नीचे अनैतिक संबंध अमोल काठे यांच्याशी असल्याचे संशय आला होता. त्यानंतर चेतनने अमोलला ठार मारायचे ठरवले. अमोलमुळे चेतनचा संसार उध्दवस्त झाल्याचा रागातून हत्या केली.

Ulhasnagar Crime News
Crime News: आधी लव्ह मॅरेज मग दुसरं लग्न, अडथळा ठरणाऱ्या बायको आणि मुलाला संपवलं; आग्र्यात दुहेरी हत्याकांड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com