Shocking: ६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, १० आणि १३ वर्षांच्या मुलांचं भयंकर कृत्य

Uttar Pradesh Crime: ६ वर्षांच्या मुलीवर १० आणि १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ५ रुपयांचे आमिष दाखवत आरोपी मुलीला सोबत घेऊन गेले आणि त्यांनी हे भयंकर कृत्य केले.
Shocking: ६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, १० आणि १३ वर्षांच्या मुलांचं भयंकर कृत्य
Uttar Pradesh CrimeSaam Tv
Published On

उत्तर प्रदेशमध्ये ६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ५ रुपयांचं आमिष दाखवत १० आणि १३ वर्षांची मुलं या मुलीला घेऊन गेले. अज्ञातस्थळी नेऊन आरोपींनी त्यावर आळीपाळीने बलात्कार केला. पीडित मुलगी घरी रडत आल्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आली. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या घटनेमुळे उत्तर प्रदेश हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. १० आणि १३ वर्षीय अल्पवयीन मुलांनी सहा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली. दोन्ही आरोपी मुलं पीडित मुलीच्या शेजारीच राहतात. त्यांनी पीडितेला ५ रुपयांचे आमिष दाखवत एका घरामध्ये घेऊन गेले. त्याठिकाणी आरोपींनी पीडित मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलगी रडत रडत घरी आली. आई-वडिलांनी तिची विचारपूस केली असता तिने घडलेली घटना सांगितली. ते ऐकून तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला.

Shocking: ६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, १० आणि १३ वर्षांच्या मुलांचं भयंकर कृत्य
Kolhapur Crime : ऑनलाईन रम्मी खेळून कर्जबाजारी, चोरी करताना वृद्ध महिलेची हत्या; मृतदेह गोबरगॅसच्या प्लांटमध्ये टाकला

पीडित मुलीच्या आई-वडिलांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही मुलांना ताब्यात घेतलं. दोघांची चौकशी केली जात आहे. पीडित मुलीवर सध्या काशीराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या तपासणी देखील करण्यात आल्या. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून प्रचंड रक्तस्राव होत आहे.

Shocking: ६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, १० आणि १३ वर्षांच्या मुलांचं भयंकर कृत्य
Crime : बंगल्यासाठी डान्सरकडून बीडच्या माजी उपसरपंचाचा घात? मृत्यूनंतर गर्लफ्रेंडचा Video समोर

पीडित मुलीला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी तिच्यावर सुरूवातीला उपचार करण्यात हलगर्जीपणा केला. पोलिसांकडून कागदपत्र आणा असे डॉक्टर सांगत राहिले. कागदपत्र दिल्यानंतरच पीडितेवर उपचार सुरू करण्यात आले. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांचे वय १५ वर्षांच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहेत. आता त्यांची रवानगी आता बालसुधारगृहामध्ये करण्यात येणार आहे.

Shocking: ६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, १० आणि १३ वर्षांच्या मुलांचं भयंकर कृत्य
Akola Crime: चाकूचा धाक दाखवत १५ वर्षीय मुलीवर बलात्कार, मध्य प्रदेश कनेक्शन उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com