Uttar Pradesh Crime : धावत्या ट्रेनमध्ये ११ वर्षीय मुलीचा विनयभंग; प्रवाशांनी लाथा-बुक्क्यांनी मारलं, रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू!

Railway Employee Molested 11 year Old Girl : एका रेल्वे कर्मचाऱ्याने ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.
११ वर्षीय मुलीचा विनयभंग
Molestedsaam tv
Published On

मुंबई : एका रेल्वे कर्मचाऱ्याने रेल्वे कर्मचाऱ्याने ट्रेनमध्येच ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. घटनेमुळे संतापलेल्या इतर प्रवाशांनी त्या रेल्वे कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या घटनेत संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. बरौनीहून नवी दिल्लीला जाणाऱ्या हमसफर एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळतेय.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, बरौनीहून नवी दिल्लीला जाणाऱ्या हमसफर एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्यामुळेप्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्याला बेदम मारहाण (Uttar Pradesh Crime) केली. लखनौ ते कानपूरपर्यंत प्रवासी त्याला मारहाण करत होते, घटनेत त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. कानपूर सेंट्रल येथील जीआरपीने या रेल्वे कर्मचाऱ्याला रुग्णालयात नेलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

११ वर्षीय मुलीचा विनयभंग
School Girl Molested By Teacher : नटून थटून आलेल्या मुलीवर शिक्षकाचा पडला डाेळा, टाकला हात; पाेलिस तपास सुरु

रेल्वे कर्मचाऱ्याने केला मुलीचा विनयभंग

पीडित मुलीच्या आईने आरोपीविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल (Crime News) केलीय. तर रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी देखील हत्येची लेखी तक्रार पोलिसांकडे दिलीय. प्रशांत कुमार, असें मृत रेल्वे कर्मचाऱ्याचं नाव आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ११ सप्टेंबर रोजी सिवानमधील एक कुटुंब समस्तीपूर-नवी दिल्लीदरम्यान धावणाऱ्या हमसफर एक्स्प्रेसमधून प्रवास करत होतं. त्यांच्यासोबत त्यांची ११ वर्षांची मुलगी देखील होती. तिचा विनयभंग केला.

रात्री मुलीची आई शौचालयात गेली असता या रेल्वे कर्मचाऱ्याने मुलीचा विनयभंग केलाय. आरोपीने तिला धमकावले देखील होते. जेव्हा तिची आई शौचालयातून परत आली तेव्हा पीडित मुलीने घडलेला प्रकार (Railway Employee Molested 11 year Old Girl) सांगितला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी घटनेची माहिती कोचमधील इतर प्रवाशांना दिली. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्याला धारेवर धरलं. मुलीची छेड काढल्यामुळे संतप्त लोकांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली.

प्रवाशांच्या बेदम मारहाणीत झाला मृत्यू

प्रवाशांनी आरोपीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पीडितेच्या कुटुंबीयांनी या घटनेची माहिती रेल्वे कंट्रोलला दिली होती. बुधवारी पहाटे ४.३५ वाजता ट्रेन कानपूर सेंट्रलच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर येताच पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं. मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला जीआरपीने उपचारासाठी केपीएममध्ये पाठवलं. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ही माहिती मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली. त्यांनी खुनाचा (Killed) आरोप केलाय, अशी माहिती टीव्ही नाईन हिंदीच्या हवाल्यानुसार मिळतेय.

११ वर्षीय मुलीचा विनयभंग
NCP Deputy President Booked For Molesting Women : विनयभंग प्रकरणी राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षावर गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com