Bareilly News : सीरियल किलरचा खुनी खेळ! महिलांना प्रेमात पाडायचा, ठराविक वेळेनंतर संपवायचा; ९ हत्यांकांडांचा असा झाला उलगडा

Bareilly serial killer news : उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील एका सीरियल किलरला अटक करण्यात आली आहे. सावत्र आई आणि बायको लग्नानंतर सोडून गेल्याने महिलांप्रती द्वेष निर्माण झाला. त्यानंतर धक्कादायक कृत्य केल्याची कबुली आरोपीने दिली.
सीरियल किलरचा खुनी खेळ! महिलांना प्रेमात पाडायचा, ठराविक वेळेनंतर संपवायचा; ९ हत्यांकांडांचा असा झाला उलगडा
Bareilly News Saam tv
Published On

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये दहशत निर्माण केलेल्या सीरियल किलरच्या अखेर मुसक्या आवळल्या आहेत. ९ महिलांच्या एका पाठोपाठ झालेल्या हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. यामुळे गावातील महिला घराबाहेर पडण्यासाठी घाबरत होत्या. अखेर पोलिसांनी सीरियल किलरला अटक केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर सीरियल किलरने हत्या करण्यामागचं धक्कादायक कारणही सांगितलं.

बरेलीमधील सीरियल किलर हा महिलांचा एकच पॅटर्नने हत्या करायचा. या वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली होती. हत्येच्या घटनेमुळे पोलीस त्याच्या मागावर होती. या सीरियल किलरचं चित्र जारी करण्यात आलं होतं. त्यानंतर ४८ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

सीरियल किलरचा खुनी खेळ! महिलांना प्रेमात पाडायचा, ठराविक वेळेनंतर संपवायचा; ९ हत्यांकांडांचा असा झाला उलगडा
Navapur Crime News : आठवडे बाजारातच पतीकडून पत्नीवर शस्त्राने हल्ला करीत खून; भर दुपारी घडलेल्या घटनेने खळबळ

९ महिलांची हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव कुलदीप कुमार असे आहे. कुलदीप कौटुंबिक कारणामुळे महिलांचा द्वेष करु लागला होता. या द्वेषातून महिलांची हत्या करण्याचं खुळ त्याच्या डोक्यात भरलं होतं. त्याने पोलीस चौकशीत ६ महिलांची हत्या केल्याचं कबुल केलं आहे.

हत्येचा एक सारखाच पॅटर्न

सीरियल किलरमुळे बरेली जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकच खळबळ माजली होती. मागील १४ महिन्यात त्याने ९ महिलांची हत्या केली होती. त्याने २० ते २५ किलोमीटर अंतरातील भागातील महिलांच्या हत्या केल्या आहेत. या महिलांच्या हत्येचा पॅटर्न एक सारखाच होता. या महिलांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह शेतात फेकून द्यायचा. त्यांच्या अंगावरील दागिनेही घेऊन जायचा.

एसएसपी अनुराय आर्य यांनी सांगितलं की, 'या घटनेचा खुलासा करताना सांगितलं की, आरोपी कुलदीप नवाबगंज पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवाशी आहे. कुलदीपला महिलांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलांकडून शरीर संबंधाची मागणी करायचा. महिलांनी विरोध केल्यास त्यांचा गळा दाबून हत्या करायचा. आरोपीने ६ महिलांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या सीरियल किलरचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

दरम्यान, सीरियल किलर २५ ते ५५ वयोगटातील महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. या महिलांच्या हत्येचा पॅटर्न एक सारखाच असायचा. हत्या करण्यात आलेल्या महिला ग्रामीण भागातील होत्या. या सीरियल किलर महिलांची गळा दाबून हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह घराजवळील सामसूम जागा किंवा शेतात फेकून द्यायचा.

सीरियल किलरचा खुनी खेळ! महिलांना प्रेमात पाडायचा, ठराविक वेळेनंतर संपवायचा; ९ हत्यांकांडांचा असा झाला उलगडा
Navapur Crime News : आठवडे बाजारातच पतीकडून पत्नीवर शस्त्राने हल्ला करीत खून; भर दुपारी घडलेल्या घटनेने खळबळ

पोलिसांसमोर दिली मोठी कबुली

उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील या सीरियल किलरला लहानपणी सावत्र आई त्रास द्यायची. पुढे बायको लग्नानंतर सोडून गेली होती. यामुळे त्याला महिलांप्रती द्वेष निर्माण झाला होता. त्यानंतर या आरोपीने धक्कादायक कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com