Mumbai Crime News: लोकलमध्ये करत होते मोबाईल चोरी, पोलीस पथक लागले कामाला अन्...

Mumbai Crime News: गर्दीचा फायदा घेत लोकल ट्रेनमध्ये प्रवासांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Digital
Published On

Mumbai Crime News

प्रवासी लोकलमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांच्या खिशातील मोबाईल लंपास करण्याच्या अनेक घटना घडत असतात. अशाचप्रकारे गर्दीचा फायदा घेत लोकल ट्रेनमध्ये प्रवासांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. गौतम सिंह आणि समीर खान अशी या दोन चोरट्यांची नावे असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

कल्याण आणि कसारा रेल्वे स्टेशन दरम्यान काही दिवसापूर्वी लोकलमध्ये प्रवास करताना दोन प्रवासांचे मोबाईल चोरीला गेले होते. या दोन्ही प्रवाशांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख यांच्या पथकाने हा तपास सुरू केला. अखेर या प्रकरणात पोलिसांना यश आले असून दोन मोबाईल चोरट्यांना अटक केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हे दोघे गर्दीचा फायदा घेत लोकल ट्रेनमध्ये प्रवास करायचे आणि प्रवाशांचे मोबाईल चोरून पसार व्हायचे. या दोघांवर याआधी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. आणखी काही गुन्हे यांच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे. सध्या यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai Crime News
Urfi Javed News: उर्फी जावेदच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

चोरटे कसे चोरतात मोबाईल

लोकलमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांची एक खास पद्धत असते. स्थानकावर प्रवासी आल्यापासून ते त्यांच्यावर पाळत ठेवतात. स्टेशनवर लोकल आली की मोबाईल कुठे ठेवतो हे हेरलं जातं आणि प्रवासी लोकलमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरटे अगदी सहज खिशातून मोबाईल काढून घेतात. कल्याण आणि कसारा रेल्वे स्टेशन दरम्यानही अशाच प्रकारे मोबाईल चोरण्यात आले होते.

Mumbai Crime News
Tamil Nadu Crime: सुखी संसाराचे स्वप्न भंगले, लग्नासाठी घरातून पळाले; ३ दिवसात नवविवाहित जोडप्यासोबत घडलं भयंकर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com