Sonam Raghuvanshi Case : सोनम राहत असलेल्या फ्लॅटमधून 'ती' ब्लॅक बॅग गायब, फ्लॅटचा मालक ताब्यात; मोठा उलगडा होणार?

Indore Sonam Raghuvanshi Case Update : पोलिसांना शिलामची भूमिका पहिलेपासूनच संशयास्पद वाटत होती. त्याला दोन दिवसांपासून चौकशीसाठी बोलावलं जात होतं. पण, तो प्रत्येकवेळी टाळाटाळ करत होता.
Indore Sonam Raghuvanshi Case Update
Indore Sonam Raghuvanshi Case Update Saam Tv News
Published On

इंदूर : इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आणखी एक मोठी गोष्ट समोर आली आहे. या प्रकरणी आता शिलाँग पोलिसांनी इंदूरच्या देवास नाका परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीचं नाव शिलाम जेम्स आहे. तो देवास नाका येथील एक इमारत भाड्याने चालवतो. पोलिसांना संशय आहे की शिलामने पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला. हा तोच एजंट आहे ज्याने सोनमला तो फ्लॅट भाड्यावर दिला होता. सोनम ज्या फ्लॅटमध्ये थांबलेली होती, त्या फ्लॅटमधील एक बॅग गायब असल्याची माहिती आहे. ज्यामध्ये ५ लाख रुपये आणि एक पिस्तूल होती. पोलिसांना संशय आहे की याच व्यक्तीने ती बॅग गायब केली असावी.

पोलिसांना शिलामची भूमिका आधीपासूनच संशयास्पद वाटत होती. त्याला दोन दिवसांपासून चौकशीसाठी बोलावलं जात होतं. पण, तो प्रत्येकवेळी टाळाटाळ करत होता. शेवटी, पोलिसांनी त्याला देवास नाक्याजवळून ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला एम.वाय.हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

Indore Sonam Raghuvanshi Case Update
Iran Israel Conflict Effect : इराण-इस्रायलच्या युद्धाचा फटका; भारतात काय काय महागणार? जाणून घ्या

पोलिसांना असंही समजलं आहे की विशालने ३१ मे रोजी नंदबागमध्ये राहणाऱ्या सुनील उछावने नावाच्या ऑटो चालकाचा ई-रिक्षा बुक केला होता. त्या रिक्षातून त्याने एक बॅग पाठवली होती. ती बॅग हिराबाग कॉलनीमध्ये एका अनोळखी व्यक्तीने पैसे देऊन घेतल्याची माहिती आहे. तपासात असेही समोर आलं आहे की, शिलाम स्वतःच्या गाडीतून तीच बॅग घेऊन जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्याने आधी मीडियाला सांगितलं होतं की, बिल्डिंगमध्ये डीव्हीआर नाही. पण, फुटेजमध्ये तो स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे तो खोटं बोलत असल्याचं उघड झालं आहे.

Indore Sonam Raghuvanshi Case Update
Shocking : देखण्या भाच्याच्या प्रेमात मामी, दोघे हॉटेलमध्ये गेले अन्, समोर आला मोठा कांड; पोलिसही हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com