Crime News : मालवणच्या जंगलात तरुणाचा सांगाडा, घटनेबाबत गुपित उलगडलं; सिंधुदुर्गात खळबळ

Sindhudurg Marathi News : घटनास्थळी सापडलेल्या वस्तूच्या वर्णनावरून चौकशी केल्यावर हा मृतदेह सांगाडा मालवण तालुक्यातील कट्टा येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेपाळी युवकाचा असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.
 Nepali youth found in Sindhudurg Malvan forest
Nepali youth found in Sindhudurg Malvan forestSaam Tv News
Published On

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी एका जंगलात विदेशी पर्यटक महिलेचा जिवंतपणे बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात एक मूळ अमेरिकन महिलेला साखळदंडांनी बांधून ठेवण्यात आलं होतं. या महिलेला सिंधुदुर्गमधून रत्नागिरी येथे उपचारासाठी हलविण्यात आलं होतं. उपचारादरम्यान ती महिला प्रथमदर्शी मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं होतं. आता, पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका जंगलात नेपाळी तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.

या सगळ्या प्रकारची माहिती कळताच मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह कट्टा पोलीस दुरक्षेत्रचे हेड कॉन्स्टेबल मोरे आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी सापडलेल्या वस्तूच्या वर्णनावरून चौकशी केल्यावर हा मृतदेह सांगाडा मालवण तालुक्यातील कट्टा येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेपाळी तरुणाचा असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली. मालवण तालुक्यातील नांदोस परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 Nepali youth found in Sindhudurg Malvan forest
Sindhudurg Crime : सिंधुदुर्गच्या जंगलात तरुणाचा सांगाडा, घड्याळ, बॅग अन् मोबाईलमुळे सख्ख्या भावाने ओळखलं

पोलिसांना घटनास्थळी मिळालेल्या वस्तूवरून त्यांनी पुढील तपास करत या मृतदेहाचा शोध लावला हा मृतदेह एका नेपाळी तरुणाचा असल्याचं तपासात समोर आलं. मात्र या नेपाळी तरुणाने केलेली आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप समजू शकलेलं नाही. या नेपाळी तरुणाच्या भावानं याची ओळख पटवली आहे. मृतदेहाजवळ मिळालेल्या बॅग, मोबाईल आदी वस्तूंच्या माध्यमातून या सगळ्याचा तपास मालवण पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

घटनास्थळी ठसे तज्ञ, श्वानपथक,फॉरेन्सिक लॅब चे पथक यांच्याकडून आवश्यक ते पुरावे ताब्यात घेऊन या सगळ्या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. या आत्महत्या प्रकरणाची नोंद मालवण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या आत्महत्या प्रकरणाचा अधिक तपास मालवण तालुक्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस करत आहेत.

 Nepali youth found in Sindhudurg Malvan forest
Crime News: भोंदूबाबाचे हायटेक कारनामे; भक्तांच्या खासगी क्षणावर डोळा, टेक्नोसेव्ही भोंदूबाबाचे बिंग फुटलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com