Crime News: भोंदूबाबाचे हायटेक कारनामे; भक्तांच्या खासगी क्षणावर डोळा, टेक्नोसेव्ही भोंदूबाबाचे बिंग फुटलं

Pimpri Chinchawad Crime: भोंदू बाबाच्या आहारी जाऊ नका. त्याच्या खोट्या दाव्याला बळी पडू नका असं आवाहन वारंवार केलं जातं. मात्र तरीही काही लोक अशा बाबांच्या लिलांना भुलतात आणि त्यांची फसवणूक होते. आता पुण्यातील एका भोंदूबाबाचे हायटेक कारनामे पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. पाहूया एक स्पेशल रिपोर्ट
Pimpri Chinchawad Crime
Pimpri Chinchawad Crime
Published On

ही दृश्य पाहिल्यानंतर हा बाबा महिलांचा किती आदर करतोय आणि महिलांबद्दल किती संवेदनशील आहे, असं वाटेल. मात्र हा चेहरा नीट निरखून पाहा. प्रसाद दादा उर्फ प्रसाद भीमराव तामराम, असं या भामट्याचं नाव. मात्र याच भामट्याच्या काळ्या कारनाम्याचं आता बिंग फुटलंय.. आपल्यात दिव्य अध्यात्मिक शक्ती असल्याचा दावा करणारा हा भामटा प्रत्यक्षात मात्र टेक्नोसेव्ही पद्धतीने भक्तांच्या खासगी आयुष्यावर पाळत ठेऊन त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवण्याचं नीच कृत्य करत असल्याचं समोर आलंय... मात्र या भोंदू बाबाच्या काळ्या कारनाम्याची मोडस ऑपरेंडी कशी आहे? पाहूयात.

प्रसाद भीमराव तामदार असं 29 वर्षीय भोंदू बाबाचं नाव

अध्यात्मिक गुरु असल्याचा दावा करत स्वतःच्या मुळशीच्या सूस येथील घरात मठाची स्थापना

भक्तांच्या मोबाईलमध्ये नकळत हिडन अॅप इन्स्टॉल करायचा

एअर ड्रॉईड कीड या हिडन अॅपने पुरुष भक्तांवर पाळत

भक्तांना अश्लील कृत्य करण्यास भाग पाडून व्हिडीओ बनवायचा

सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या या भामट्याच्या त्रासाला कंटाळून एका भक्ताने थेट पोलीस ठाणे गाठलं आणि भोंदूबाबाविरोधात तक्रार दाखल केली.. त्यानंतर पोलिसांनी भोंदू बाबाच्या मुसक्या आवळल्यात. प्रसाद तामदार याचे महिलासोबत डान्स करतानाचे, ओटी भरतानाचे, मुलगी मुलगी म्हणत महिलांना मिठीत घेतल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मात्र आता याच भोंदू बाबाचा बुरखा फाटल्याने दादा दादा करत पूजा करणाऱे भक्त पुरते हादरलेत.एकूणच प्रसाद दादाच्या या पोलखोलमुळे सारासार विचार न करता कुणालाही देवाचा अवतार मानून पायावर सपशेल लोटांगण घालणाऱ्या समस्त भक्तांसाठीही हा मोठा धडा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com