Shocking : धक्कादायक! आईने पोटच्या २० दिवसांच्या चिमुकलीला जमिनीखाली गाडलं, चिमुरडीची मृत्यूशी झुंज सुरु

Uttar Pradesh Crime : उत्तर प्रदेशात तब्बल २० दिवसांच्या नवजात बाळाला जमिनीखाली गाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेंढपाळाच्या जागरूकतेने चिमुकलीचा जीव वाचवला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आई-वडिलांचा तपास सुरू केला आहे.
Shocking : धक्कादायक! आईने पोटच्या २० दिवसांच्या चिमुकलीला जमिनीखाली गाडलं, चिमुरडीची मृत्यूशी झुंज सुरु
Uttar Pradesh CrimeSaam Tv
Published On
Summary
  • उत्तर प्रदेशात २० दिवसांच्या नवजात बाळाला जमिनीखाली गाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • मेंढपाळाच्या जागरूकतेने चिमुकलीचा जीव वाचला असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

  • डॉक्टरांनी बाळाच्या नाका तोंडात माती गेल्याचं सांगितलं आहे.

  • पोलिस तपास सुरू असून या कृतीमागचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

उत्तर प्रदेशातून मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. तब्बल २० दिवसांच्या नवजात बाळाला जमिनीखाली गाडलं गेल्याची थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मात्र एका मेंढपाळाने या चिमुकलीचा जीव वाचवला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या चिमुकलीच्या नाका तोंडात माती गेल्याने ती सध्या जगण्यासाठी संघर्ष करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात नुकत्याच जन्मलेल्या २० दिवसांच्या चिमुरडीला जमिनीखाली गाडण्यात आले होते. एक मेंढपाळ त्याच्या शेळ्या चरण्यासाठी त्या भागात घेऊन गेला होता. या दरम्यान या मेंढपाळाला लहान मुलाच्या रडण्याचा बारीक आवाज येऊ लागला. मेंढपाळाने आजूबाजूस पहिले असता त्याला तिथे कोणीच दिसले नाही. थोड्या अंतरावर असलेल्या चिखलात मेंढपाळाला चिमुकला हात चिखलाच्या ढिगाऱ्यातून वर येताना दिसला.

Shocking : धक्कादायक! आईने पोटच्या २० दिवसांच्या चिमुकलीला जमिनीखाली गाडलं, चिमुरडीची मृत्यूशी झुंज सुरु
Crime News : IPS असल्याचे सांगून लोकांना चुना लावायच्या, पुण्यात मायलेकीचा भंडाफोड, नेमकं जाळ्यात अडकल्या कशा?

घाबरलेला मेंढपाळ जीव एकवटून पुढे सरसावला. त्याने जमिनीवरचा चिखल बाजूला केला असता त्याला एक नवजात चिमुकली सापडली. मेंढपाळाने लगबगीने आजूबाजूच्या नागरिकांना गोळा केले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असून या चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Shocking : धक्कादायक! आईने पोटच्या २० दिवसांच्या चिमुकलीला जमिनीखाली गाडलं, चिमुरडीची मृत्यूशी झुंज सुरु
Crime News : मित्रानेच काढला मित्राचा काटा, जुन्या वादातून डोक्यात तिडीक गेली अन् जीव घेतला, भिवंडीत रक्तरंजित थरार

मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, या चिमुकलीच्या नाका तोंडात माती गेल्याने तिला श्वास घेण्यास त्रास होत आहे. तिची प्रकृती गंभीर होती, तिला हायपोक्सिया किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेची लक्षणे दिसत आहेत. तिला कीटकांनी आणि एखाद्या प्राण्याने चावले होते. तिच्या अंगावर त्याच्या खुणा देखील आहेत.

Shocking : धक्कादायक! आईने पोटच्या २० दिवसांच्या चिमुकलीला जमिनीखाली गाडलं, चिमुरडीची मृत्यूशी झुंज सुरु
Nagpur Health Crisis : विषारी औषध की मेंदूज्वर? नागपूर आणि मध्यप्रदेशातील बाल मृत्यूमागचं नेमकं कारण आलं समोर

२४ तासांनंतर आम्हाला तिच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा दिसली, पण त्यानंतर तिची प्रकृती आणखी खालावली आहे. बाळाला पुरल्यानंतर लगेचच ती सापडली असावी कारण तिच्या जखमा ताज्या होत्या. सध्या प्लास्टिक सर्जनसह डॉक्टरांची एक टीम बाळावर उपचार करत आहे. असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या चिमुकलीच्या आई वडिलांचा पोलीस तपास करत असून राज्यातील बाल हेल्पलाइनला या बाळाबद्दल माहिती देण्यात आली आहे. तसेच या मुलीला इथे का गाडण्यात आलं हे अद्यापही अनुत्तरित आहे. या घटनेने गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com