
मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यामध्ये एका तरुणाने बायको आणि सासूच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. फेसबुकवर लाईव्ह करत या तरुणाने आत्महत्या केली. त्यावेळी त्याची निर्दयी पत्नी आणि सासू लाइव्ह व्हिडीओ बघत होत्या. पण त्यांनी या तरुणाला आत्महत्या करण्यापासून रोखलं नाही. लाइव्ह व्हिडीओमध्ये या तरुणाने आपल्या आत्महत्येला पत्नी आणि सासू जबाबदार असल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातल्या मेहरा गावामाध्ये राहणाऱ्या शिवप्रकाश तिवारी या तरुणाने १६ मार्च रोजी आत्महत्या केली. शिवप्रकाशने फेसबुकवर लाइव्ह करत आत्महत्या केली. याप्रकरणी शिवप्रकाशची पत्नी प्रिया तिवारी आणि सासू गीता दुबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. दोघींनीही शिवला मानसिक त्रास दिला.
सिरमौरचे एसडीओपी उमेश प्रजापती यांनी सांगितले की, सेल्समन म्हणून काम करणाऱ्या शिवप्रकाशचे लग्न दोन वर्षांपूर्वी बैकुंठपूर येथील रिमारी गावातील प्रियासोबत झाले होते. लग्नाच्या काही महिन्यांनंतर शिवप्रकाशची पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत लपून छपून फोनवर बोलू लागली. ज्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले.
दोन महिन्यांपूर्वी एका अपघातात शिवप्रकाशचा पाय तुटल्यानंतर तो कुबड्यांवर अवलंबून राहिला. यानंतर पत्नी नवजात बाळाला घेऊन तिच्या माहेरी गेली आणि तिने सासरी परत येण्यास नकार दिला. त्यामुळे शिवप्रकाश प्रचंड मानसिक तणावाखाली होता. शिवप्रकाशने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुकवर लाइव्ह करत त्याची संपूर्ण परिस्थिती सांगितली.
शिवप्रकाशची पत्नी आणि तिची आई ४४ मिनिटं शिवप्रकाशचा व्हिडीओ लाइव्ह पाहत राहिल्या पण त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.आत्महत्या करण्यापूर्वी शिवप्रकाश आपल्या पत्नीला समजावण्यासाठी सासरच्या घरी गेला होता. परंतु तिथेही त्याला अपमानित करण्यात आले आणि मारहाण करण्यात आली. यानंतर तो घरी आला आणि त्याने गळफास घेऊन जीवन संपवलं. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.