Air Force Officer Couple Death: 'आमच्यावर एकत्र अंत्यसंस्कार करा' अशी चिठ्ठी लिहित भारतीय हवाई दलात काम करणाऱ्या पती- पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घडली. दीनदयाल दीप असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे तर रेणू तंवर असे पत्नीचे नाव आहे. आधी पतीने मृत्यूला कवटाळले आणि ही बातमी समजल्यानंतर पत्नीनेही आपले आयुष्य संपवले. दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केलेल्या जोडप्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील हवाई दलात काम करणाऱ्या जोडप्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दीनदयाल दीप आणि रेणू तंवर अशी दोघांची नावे आहेत. दीनदयाल दीप हे भारतीय हवाई दलात फ्लाइट लेफ्टनंट होते. तर त्यांची पत्नी रेणू तंवर आग्रा येथील मनसे (मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस) मध्ये कॅप्टन होती. रेणू तन्वर आग्राहून दिल्लीत आली होती. जिथे ती दिल्ली कँट भागातील लष्कराच्या गौरौदा शरत ऑफिसर्स गेस्ट हाऊसमध्ये राहात होती.
आग्रा येथील एअर फोर्स स्टेशनवर फ्लाइट लेफ्टनंट म्हणून तैनात दीनदयाल दीप हे बिहारचे रहिवासी होते. त्यांची पत्नी कॅप्टन रेणू तंवर या राजस्थानच्या रहिवासी होत्या. दोघांनी प्रेमविवाह केला होता. दोघांची नियुक्ती आग्रा येथेच होती. मात्र, रेणू आपल्या आईच्या एम्समध्ये उपचारासाठी भावासोबत दिल्लीला आली होती. आर्मी कॅन्टच्या गेस्ट हाऊसमध्ये ती राहात होती. १५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री मित्रांसोबत गप्पा मारुन दीप हे झोपायला गेले आणि त्याच रात्री त्यांनी आत्महत्या केली.
पतीच्या आत्महत्येची बातमी समजताच पत्नी रेणू ही हादरुन गेली. आग्र्यात पतीने आत्महत्या केल्याचे समजताच पत्नीनेही आर्मी ऑफिसर्स गेस्टहाऊसमध्ये गळफास घेत आपले आयुष्य संपवले. पोलिसांंनी खोलीचा दरवाजा तोडला असता रेणूचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याठिकाणी एक चिठ्ठीही आढळून आली. ज्यामध्ये माझी इच्छा आहे की माझे अंत्यसंस्कार माझ्या पतीसोबत व्हावेत. माझा हात माझ्या पतीच्या हातात ठेवावा' असा मजकूर लिहण्यात आला होता. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, पती-पत्नीच्या आत्महत्येच्या वृत्ताने कुटुंबात शोककळा पसरली आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा रेणू यांचे पार्थिव आग्रा येथे आणण्यात आले. फ्लाइट लेफ्टनंट आणि पत्नीचे मृतदेह आग्रा एअर फोर्स कॉम्प्लेक्समध्ये ठेवण्यात आले आहेत. दोघांचेही मृतदेह आज बिहारमधील नालंदा येथील मोरारा येथे नेण्यात येणार आहेत. तिथेच दोघांचेही अंत्यसंस्कार होणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.