Crime : धाराशिवमध्ये क्रूरतेचा कळस; रॉड,काठीने अमानुष मारहाण करत तरूणाला रस्त्यावर फेकलं

Crime News in Marathi : धाराशिवमध्ये एका तरूणाला आठ ते १० जणांच्या टोळक्यांनी बेदम मारहाण केली. त्याला अमानूष मारहाण केल्यांनंतर रस्त्याच्या बाजूला फेकलं. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Crime News
Crime NewsSaamTV
Published On

माधव सावरगावे

Dharashiv Crime : धाराशिव जिल्ह्यातील रूममध्ये एका तरुणास अमानुष मारहाण करून रस्त्यावर फेकल्याची घटना समोर आली आहे. तरूणावर सध्या सोलापुरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली केली. तीन मार्च रोजी घडलेली घटना ही आता समोर आली आहे.

धाराशिवमधील भूम तालुक्यातील पाथ्रूड येथील एका १८ वर्षीय तरुणास क्रूरतेचा कळस गाठत सात ते आठ जणांनी रॉड, काठी तसेच तीक्ष्ण हत्याराने मारहाण केली. मृत झाल्याचे समजून त्यास रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना मंगळवारी (दि. ११) उजेडात आली आहे. हा तरुण मृत्यूशी झुंज देत असून, याप्रकरणी परंडा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

भूम तालुक्यातील पाथ्रूड येथील माउली बाबासाहेब गिरी असे अमानुष मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या वडिलांनी परंडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, ३ मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास माउलीचा त्यास परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील सतीश जगताप व इतर सहा ते सात जणांनी लोखंडी रॉड, काठीने जबर मारहाण केल्याचा फोन आला होता. यानंतर त्यास फोन केला असता तो सातत्याने बंद लागत होता. यामुळे बस प्रवासात फिर्यादी वडिलांनी त्यांचे भाऊ व मित्राला याबाबतची माहिती देऊन शोध घेण्याची विनंती केली.

Crime News
Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव

दरम्यान, सायंकाळी ५ वाजता काळेवाडी येथील पोलिसपाटलांनी बाबासाहेब गिरी यांना फोन करून त्यांचा मुलगा माउली यास जबर मारहाण करून फेकून दिल्याचे सांगितले. माउलीला जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतरही सुधारणा होत नसल्याने त्यास सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. दरम्यान, याबाबत बाबासाहेब गिरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून परंडा ठाण्यात आरोपी सतीश जगताप व अन्य सहा ते सातजणांवर गुन्हा दाखल करून यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मंगळवारी परंडा ठाण्यातून मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com