
सचिन कदम, साम टिव्ही
रायगड : रायगड जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात पिडीत अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिचा बालविवाह झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नवरदेव राजेश सोन्या पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसळा तालुक्यातील कोळे आदिवासी वाडी येथील ही घटना असून या प्रकरणी तळवडे आरोग्य केंद्राच्या सेविकेमार्फत म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सदर पिडीत मुलगी ही १४ वर्षीय महिन्याची असून ती गर्भवती आहे. पिडीत मुलगी तपासणीसाठी आरोग्य उपकेंद्रात आली असता संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. आरोपीने पिडित अल्पवयीन मुलीशी प्रथम शारीरिक संबध ठेवले आणि ती गर्भवती असल्याचं समजल्यानंतर विवाह केला असल्याचं देखील समोर आलं आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता तरतुदीनुसार म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील शिक्षिकेचे धक्कादायक कारनामे उघड
मुंबईमधील एका प्रसिद्ध शाळेमध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. गेल्या वर्षभरापासून ही शिक्षिका विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवत होती. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या शिक्षिकेविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत तिला अटक केली.
ही शिक्षिका ४० वर्षांची असून तिचे लग्न झाले आहे. तिला मुलं देखील आहेत. तिने ११वी मध्ये शिकणाऱ्या १६ वर्षांच्या मुलासोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०२३ शाळेमध्ये झालेल्या वार्षिक कार्यक्रमासाठी डान्स ग्रुप तयार करण्यासाठी झालेल्या मिटिंगवेळी ही शिक्षिका विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली. तिने जानेवारी २०२४ मध्ये या विद्यार्थ्यासोबत पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवले.
या घटनेनंतर विद्यार्थी प्रचंड घाबरला होता. त्याने या शिक्षिकेपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. दहावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्याने शाळा सोडली. त्यानंतर देखील ही शिक्षिका या विद्यार्थ्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत होती. त्यासाठी तिने एका मैत्रिणीची मदत घेतली. पोलिसांनी या महिला शिक्षिकेच्या मैत्रिणीवर देखील गुन्हा दाखल केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.