
अकोला : अकोल्यात कॉलरा आजारामुळे एकाचा बळी गेलाय. विष्णू बद्रे असं कॉलरा आजारामुळे मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. अकोला जिल्ह्यातील कासवा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या धामणा बुद्रुक या गावातील ते रहिवासी होते. त्यांना कॉलरा आजाराची लागण झाली होती. त्यांचा अहवाल कॉलरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आज या गावात आरोग्य विभागाच्या पथकाने भेटी दिल्या. दूषित पाणी प्यायल्यामुळे विष्णू बद्रे यांना 'कॉलरा'ची लागण झाली होती.
दरम्यान, आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांनी गावात भेटी देत पिण्याच्या पाण्याची पाहणी केली. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला योग्य स्वच्छता ठेवण्याच्या सूचना देखील दिल्या. सद्यस्थितीत गावात कॉलराचे आणखी रुग्ण नसल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या आजाराची माहिती समजताच धामणा गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.
आरोग्य पथकाकडून गावकऱ्यांना प्रशिक्षणाचे धडे
गावकऱ्यांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे, आरओ पाण्याचा वापर करावा. ताप, मळमळ, पोटदुखी, हगवण, डोकेदुखी यासह इतर लक्षणे आढळताच तपासणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याशिवाय गावकऱ्यांना आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, कॉलरा हा एक जीवाणूजन्य आजार आहे. जो सामान्यतः दूषित पाण्याद्वारे पसरतो. असुरक्षित पिण्याचे पाणी, अस्वच्छता आणि अपुरी स्वच्छता असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना कॉलराचा सर्वाधिक धोका ठरु शकतो. त्यामुळे गावकऱ्यांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावं. त्यासोबतच घर आणि परिसरात स्वच्छता ठेवावी, असं आवाहनही आरोग्य विभागाने केलंय.
दरम्यान, 'अनेकदा ग्रामपंचायत विभागाला दूषित पाणी संदर्भात सांगितलं होतं. परंतु ग्रामसेवकांनी आणि संबंधितांनी ऐकलं नाही. अचानक माझ्या पतीची तब्येत बिघडली. त्यांना अकोला शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं, आणि उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला. कॉलरा आजरामुळे मृत्यू झाल्याचं शासकीय रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. माझी परिस्थिती बिकट असून घरातील प्रमुख व्यक्ती गेल्यानं शासनाकडून काहीतरी मदत देण्यात यावी', अशी मागणी बद्रे कुटूंबीयांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.