अलख निरंजन! डार्क वेबवर कोड वापरून ड्रग्सची तस्करी करणारी टोळी, पुणे पोलिसांनी उघडकीस आणलं आंतरराष्ट्रीय नेक्सस

pune news : डार्क वेबवर कोड वापरून ड्रग्सची तस्करी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पुणे पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.
pune news update
pune newsSaam tv
Published On
Summary

अमली पदार्थांच्या तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड

तस्करी प्रकरणात ५ जणांना अटक

अमली पदार्थ विरोधी पथकाची ही मोठी कारवाई

पुणे पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीचे एक मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणलं आहे. देशातील विविध शहरं ज्यामध्ये पुण्यासह, मुंबई, गोवा, गुवाहाटी येथून ५ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ३.४५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे पोलिस परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या खडकी पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तसेच गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. कारवाई मध्ये अटक केलेल्या आरोपींच्या विविध बँकेतील खाती, क्रिप्टो व्होलेट आणि परदेशी चलनातून सुमारे ७ lakh ८० हजार रक्कम गोठवण्यात आली आहे.

pune news update
दक्षिण आफ्रिका टी२० सीरीजसाठी टीममध्ये मोठा फेरबदल; स्टार खेळाडू संघाच्या बाहेर, जसप्रित बुमराहचं काय?

पुण्यातील खडकी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक केली होती. तुषार चेतन वर्मा (वय २१) असे या तरुणाचे नाव होते. त्याच्याकडे चौकशी केली असता या संपूर्ण प्रकरणाचा तपास विस्तारला.

वर्मा याच्याकडे तपास करता तो सुमित डेडवाल आणि अक्षय महेर या दोघांकडून अमली पदार्थ आणत असल्याचे निष्पन्न झाले. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी पिंपरी-चिंचवड मध्ये एक फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे चक्क हायड्रोपोनिक गांजाची शेती उभारली होती.

पोलिसांनी त्याठिकाणी ही शेती उध्वस्त करत अमली पदार्थ जप्त केले. तांत्रिक पद्धतीने पोलिसांनी तपास वाढवत मुंबई व गोवा येथे छापे टाकले. तपासादरम्यान, मलय राजेश देलीवाला या ड्रग्स पेडलर याला सुद्धा अटक केली.

डार्क वेबवरून कोड नेम वापरून अंमली पदार्थांची खरेदी विक्री

यातील सर्व जण हे डार्क वेब चा वापर करत होते. डार्क वेब च्या साह्याने अमली पदार्थांची खरेदी व विक्री करण्यासाठी यातील प्रमुख आरोपी वर्मा ने त्याचं नाव "अलख निरंजन" असं ठेवलं होतं. खरेदी विक्रीसाठी लागणाऱ्या पैशांचा व्यवहार यावर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून आरोपी क्रिप्टोकरन्सी च्या माध्यमातून सगळ्या देवाण घेवाण करत होते. या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोर फक्त भारतातील शहरापर्यंत मर्यादित नसून थेट थायलंड, भूतान सारख्या देशांपर्यंत पोहचले आहेत. या प्रकरणी अजून ५ जणांचा शोध पोलिसांकडून सुरू असून त्यातील काही जणं हे परदेशी नागरिक असल्याचं सांगितलं जात आहे.

pune news update
Shocking : कबड्डी सामना सुरू होण्याच्या काही मिनिटं आधीच प्रसिद्ध कबड्डीपटूला घातल्या गोळ्या

डिलिव्हरी अॅपवरून अमली पदार्थांची तस्करी

यातील अनेक आरोपी हे अमली पदार्थांची खरेदी विक्रीसाठी चक्क ऑनलाईन डिलिव्हरी ऍप्लिकेशन चा वापर करत असल्याचं तपासातून समोर आलं आहे. ज्या पद्धतीने या ड्रग्स ची मागणी येत असे त्याप्रमाणे काही ऑनलाइन अँप च्या माध्यमातून याची खरेदी व विक्री केली जात होती. अशा ऑनलाइन डिलिव्हरी अँप कंपनीच्या मालकांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.

pune news update
लग्न करून लुटणाऱ्या टोळीचा धुडगूस; नवरदेवाच्या वडिलांचं अपहरण, एकाला जबर मारहाण करून लुटलं

कोणाकडून किती ड्रग्सचा साठा जप्त?

१. तुषार चेतन वर्मा (वय २१): ३६ हजार २५० रुपयांचा १ किलो १९४ ग्रॅम गांजा, इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटा, एक अॅपल कंपनीचा आयफोन १३. प्लास्टिक पिशव्या इत्यादी साहित्य

२. सुमित संतोष डेडवाल (वय २५): यापूर्वी ड्रग्सची तस्करी केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे

३. अक्षय सुखलाल महेर (वय २५): ४४ लाख ९९ हजार रुपयांचा ४०८.७८ ग्रॅम ओ.जी.कुश गांजा (हायड्रोफोनिक), १९ टी.एच.सी. पिल्स, ओ.जी. कश गांजा (हायड्रोफोनिक) प्लांट मधील साहित्य

४. मलय राजेश डेलीवाला (वय २८): २ लाख ८१ हजार रुपयांचा १३२५ ग्रॅम ओ.जी. कुश हायड्रोफोनिक गांजा, १३२ ग्रॅम गांजा ,४१४ ग्रॅम चरस, ४९६ ग्रॅम सायकलेडीक मशरुम, ४० ग्रॅम सी.बी.डी. ऑईल, २ ग्रॅम एम.डी., २५४ नग THC oil गमीज, १२ ग्रॅम एल.एस.डी. पेपर, ६७ ग्रॅम एम.ए.एम.डी. पिल्स व इतर साहित्य

५. स्वराज अनंत भोसले (वय २८): सध्या पोलिस कोठडी मध्ये असून पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com