Pune Crime: पुणे विमानतळावर मोठी कारवाई; तस्करांकडून २७ कोटींचा गांजा जप्त, असे अडकवले जाळ्यात

Pune Crime: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी २७ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Pune Crime Smuggling Of Hydroponic Cannabis ganja Worth 27 Crore Seized
Pune Crime Smuggling Of Hydroponic Cannabis ganja Worth 27 Crore SeizedSaam Tv
Published On
Summary
  • पुणे विमानतळावर २६.८०कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त.

  • थायलंड ते पुणे विमानातून ड्रग्ज तस्करीचा प्रयत्न.

  • जेवणात लपवून गांजा आणल्याचा संशय.

Pune Crime: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ७६.५८ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. थायलंडहून आणलेल्या खाद्यपदार्थांमध्ये हे अमली पदार्थ लपविण्यात आले होते. त्याची आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारातील किंमत सुमारे २६.८० कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणी पुणे सीमाशुल्क विभागाने एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. थायलंडहून पुण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या खाद्यपदार्थांच्या आयात मालाची तपासणी करताना हा प्रकार उघड झाला. संबंधित माल संत्र्याच्या फोडी (मँडरिन ऑरेंज सॅक्स) असल्याचे सांगण्यात आले होते. पांढऱ्या थर्माकोलच्या बॉक्समध्ये पॅक केलेल्या या मालाचे स्कॅनिंग करण्यात आले. परंतु ते खाद्यपदार्थ सेंद्रिय स्वरूपाचे नसल्याचा संशय आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एक बॉक्स उघडून पाहिला असता त्यात सीलबंद टिनचे डबे आढळले. या डब्यांमध्ये सुरुवातीला मीठासारखी पांढऱ्या रंगाची पावडर दिसली. मात्र तपासणीत पावडरमध्ये व्हॅक्यूम सीलबंद पारदर्शक प्लास्टिक पॅकेट्समध्ये हायड्रोपोनिक गांजा लपवून ठेवल्याचे आढळले.

Pune Crime Smuggling Of Hydroponic Cannabis ganja Worth 27 Crore Seized
Famous Director Death: मनोरंजन विश्वातील तारा निखळला; प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड

संपूर्ण मालाची तपासणी केल्यानंतर ७६.५८ किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तातडीने शोधमोहीम राबवून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.

Pune Crime Smuggling Of Hydroponic Cannabis ganja Worth 27 Crore Seized
Famous Singer Death: प्रसिद्ध गायकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू; कुटुंब बुडाले शोकसागरात

मागील काही महिन्यांपासून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे समोर येत आहे. सीमाशुल्क विभागाने मागील काही महिन्यांत अशा तस्करीविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या आहेत. मात्र, पुणे शहरात हा गांजा नेमका कोणाकडे आणि कशा मार्गाने पोहोचतो, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. तस्करांची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी सीमाशुल्क विभाग आणि पुणे पोलिसांनी समन्वयाने कारवाई करण्याची गरज आहे.

हायड्रोपोनिक गांजा नेमका काय ?

हायड्रोपोनिक’ म्हणजे अशी शेती पद्धत ज्यामध्ये माती न वापरता पाण्यात विरघळलेल्या पोषक द्रव्यांच्या साहाय्याने झाडे वाढवली जातात. त्यामुळे ‘हायड्रोपोनिक गांजा’ म्हणजे विशेष तंत्रज्ञान वापरून, मातीविना नियंत्रित वातावरणात गांजा पिकविण्यात येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com