Pune Crime: कार्यालयात शिरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाणीचा प्रयत्न, CCTV Video व्हायरल

Pune Crime NCP Office bearer Attempted Assault: महर्षी नगर भागात तीन जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात घुसून एका पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime NCP Office bearer Attempted Assault
CCTV footage shows attackers entering NCP office in Pune and attempting assault.saam tv
Published On
Summary
  • या घटनेचा संपूर्ण प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

  • पुण्यातील महर्षीनगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात मारहाणीचा प्रयत्न

  • या प्रकरणी तीन जणांविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

कार्यालयात शिरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना पुण्यातील महर्षीनगरमध्ये घडलीय. ही घटना तेथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्याकडे पुणे शहर माहिती अधिकार सेलची जबाबदारी आहे. दिनेश पंडित खराडे असं या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Crime NCP Office bearer Attempted Assault
Crime News: पुणे, बीडनंतर आता लातूरमध्ये गुंडाराज;भरचौकात तरुणावर तलवारीनं हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता घडला. दिनेश खराडे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे सध्या माहिती अधिकार सेलचे पुणे शहरची जबाबदारी आहे. महर्षीनगर परिसरात त्यांचे कार्यालय आहे. ५ नोव्हेंबर रोजी ते कार्यालयात असताना रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक तरुण त्यांच्या कार्यालयात शिरला. त्याच्या हातामध्ये लाकडी बांबू होता. त्याने अचानक त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

Pune Crime NCP Office bearer Attempted Assault
Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

दरम्यान मारहाणीनंतर तो दुचाकीवरून पळून गेला. खराडे यांच्या कार्यालयाबाहेर एका दुचाकीवर दोनजणं थांबले होते. कार्यालयात शिरलेला तरुण त्या दोघांसोबत तेथून पसार झाला. मारहाणीची प्रयत्न करणारा तरुण नेमका कोण होता? कशासाठी मारहाण करण्याचा प्रयत्न केला, याचं कारण समजू शकलेले नाहीये. दरम्यान या घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत. यात काही तरुण पळताना दिसत आहेत.एका तरुणाचा हातात लाकडी बांबू दिसत आहे.

कोयता गँग, टोळी युद्धानं बेजार झालेल्या पुण्यातील गुंडगिरी कमी होताना दिसत नााहीये. गावगुंडांना आणि कोयता गँगच्या सदस्यांना वटणीवर आणण्यासाठी पुणे पोलीस अनेक उपाय योजना करत आहे. जेथे दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तेथेच गावगुंडाची धिंड देखील पुणे पोलिसांकडून काढण्यात आल्या तरी शहरातील गुंडगिरी कमी होताना दिसत नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com