Shocking Crime in Pimpri: खुनी जुगार; वादानंतर दाजीची सटकली,तोडले मेव्हण्याचे दोन्ही हात अन्...

Pune Crime News: पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक गुन्हा घडलाय. जुगारातून झालेल्या वादातून आरोपी योगेश अनंता गायकवाडने त्याचा मेहुणा थोरात याची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. पोलिसांचा शोध सुरू आहे.
Hingoli Crime
“Pimpri-Chinchwad murder case: Brother-in-law killed over gambling dispute in slum areaSaam tv
Published On
Summary
  • जुगाराचे पत्ते खेळताना झालेल्या वादातून दाजीनं आपल्या मेव्हण्याचा धारदार शस्त्राने खून केला.

  • हत्या झालेल्या तरुणाचे नाव थोरात असून त्याचा मृत्यू जागीच झाला.

  • आरोपी योगेश अनंता गायकवाड असून तो सराईत गुन्हेगार आहे.

गोपाल मोटघरे, साम प्रतिनिधी

जुगारच्या खेळाने दाजी हत्यारा बनला.पत्ते खेळताना झालेल्या वादानंतर एका व्यक्तीने आपल्या मेव्हण्याचा धारदार शस्त्राने वार करत खून केला. हत्येची ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील बिजलीनगर येथील झोपडपट्टीत घडलीय. हाती आलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या युवकाचे नाव थोरात असून. त्याच्याच दाजीनं त्याचा खून केलाय. हत्यारा दाजी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचे नाव योगेश अनंता गायकवाड आहे.

Hingoli Crime
सूनेला अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलं, नंतर साप सोडला; महिला ओरडत राहिली पण.. सासरच्यांकडून छळ

जुगाराचे पत्ते खेळत असताना झालेल्या किरकोळ वादात तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात तरुणाची दोन्ही हात पूर्णपणे तुटले असून तरुण जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणाची माहिती मिळताच चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तरुणाची हत्या करणारा आरोपीच्या शोध आता चिंचवड पोलीस घेत आहेत.

Hingoli Crime
Bhandara Crime : दारूच्या नशेत बारमध्ये तुफान राडा; पोलीस नायकावर फोडला काचेचा ग्लास, पोलिसासह एक जखमी

तुळशीबागेत दुकान लावण्यावरून हाणामारी

पुण्यातील तुळशीबागेत दुकान लावण्याच्या वादातून दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशन मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे हे दम्पत्य गेल्या १० वर्षांपासून दुकान त्या जागेवर दुकान लावतातय. त्यांनाच "इथे दुकान लावू नका" असे म्हणत त्यांना मारहाण करण्यात आलीय. "तुम्ही बाहेरून आला आहात तिथे दुकानात लावू नका" अशा प्रकारची धमकी देत दाम्पत्याला मारहाण झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com