Pune Crime: प्रेयसीने संपर्क तोडला, प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या; धक्कादायक घटनेने पुणे हादरलं!

Pune Breaking News: रविवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक घटनेने पुणे शहर हादरुन गेले असून याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime: प्रेयसीने संपर्क तोडला, प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या; धक्कादायक घटनेने पुणे हादरलं!
Pune CrimeSaam Tv

अक्षय बडवे, पुणे, ता. १९ मे २०२४

पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी. प्रेयसीने संपर्क तोडल्याच्या रागातून तरुणाने तिच्या बहिणीवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना पुण्यातील गंज पेठेत घडली. रविवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक घटनेने पुणे शहर हादरुन गेले असून याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी ऋषी बागुल हा त्याच्या मित्रासोबत रात्री २ वाजण्याच्या सुमारास त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या राहत्या घरी आला होता. यावेळी प्रेयसीच्या बहिणीसोबत त्याची झाली आणि त्यांच्यात वाद सुरू झाले. ऋषी बागुल याच्या प्रेयसीने त्याच्याशी संपर्क कमी करुन त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्याने त्याला राग आला. तसेच ती न भेटल्यामुळे त्याचा राग अनावर झाला.

याच गोष्टीचा राग मनात धरून त्याने त्याच्याकडील पिस्टल प्रेयसीच्या बहिणीवर रोखून जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. मला जर ती मिळाली नाही तर मी कोणालाही सोडणार नाही" अशी धमकीही त्याने यावेळी दिली, तसेच त्याने प्रेयसीच्या राहत्या घराला बाहेरुन कडी लावून दोघेही निघुन गेले.

Pune Crime: प्रेयसीने संपर्क तोडला, प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या; धक्कादायक घटनेने पुणे हादरलं!
Arvind Kejriwal News: 'आम्हाला अटक करा..' CM केजरीवाल यांचा भाजप कार्यालयावर मोर्चा; कलम १४४ लागू, दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा!

या गोळीबारात फिर्यादी यांची दुसरी बहीण किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेनंतर खडक पोलीस ठाण्यात ऋषी बागुल आणि त्याच्या साथीदाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, पुण्यामध्ये वारंवार घडणाऱ्या गोळीबाराच्या घटनांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

Pune Crime: प्रेयसीने संपर्क तोडला, प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या; धक्कादायक घटनेने पुणे हादरलं!
Sangli Loksabha News: सांगलीचा 'भावी खासदार' कोण? बुलेट, युनिकॉर्नची पैज आली अंगलट; दोघांवर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com