Solapur Pitbull Dog Attack: पिटबुल कुत्र्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी, कुत्र्याच्या मालकाच्या घरावर ऑल इंडिया पँथर सेनेचं आंदोलन

All India Panther Sena: सोलापुरात शुक्रवारी आसिफ मुल्ला या तरुणावर पिटबुल जातीच्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला होता. यात तो तरुण गंभीर जखमी झाला आहे.
Solapur Pitbull Dog Attack
Solapur Pitbull Dog AttackSaam Digital
Published On

Solapur Pitbull Dog Attack

सोलापुरात तरुणावर हल्ला केलेल्या पिटबुल जातीच्या कुत्र्याच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शनिवारी ऑल इंडिया पँथर सेनेने ईश्वर गारमेंट कंपनीच्या आणि कुत्र्याच्या मालकाविरोधात जोरदार आंदोलन केलं. तसेच कंपनीच्या मालकावर कारवाई न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा, ऑल इंडिया पँथर सेनेन दिला आहे.

सोलापुरात शुक्रवारी आसिफ मुल्ला या तरुणावर पिटबुल जातीच्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला होता. यात तो तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Solapur Pitbull Dog Attack
Wardha Crime News: आधी कारमध्ये जबरदस्तीने बसवलं, दारू पाजली; नंतर अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

पिटबुल कुत्र्याच्या या हल्ल्याची दखल घेत ऑल इंडिया पँथर सेनेन ईश्वर गारमेंट कंपनी विरोधात शनिवारी आंदोलन केलं. यावेळी संघटनेने आसिफ मुल्ला या तरुणाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली. तसेच कुत्र्याच्या मालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे. मात्र ईश्वर गारमेंट कंपनीचे मालक नितीन अंबुरे सध्या सोलापुरात नसल्यामुळे त्यांच्याकडून कोणतही स्पष्टीकरण आलेलं नाही. त्यामुळे नितीन अंबुरे यांच्यावर योग्य कारवाई नझाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा युवा महासचिव अजय प्रक्षाळे यांनी दिला आहे.

Solapur Pitbull Dog Attack
Gautami Patil News: गौतमीच्या अडचणी वाढणार? पनवेलमधील कार्यक्रमानंतर आयोजकांवर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com