पालघर, ता. ३ सप्टेंबर २०२४
पुण्यामध्ये माजी नगरसेवकाची भरचौकात गोळ्या झाडून अन् तलवारीने वार करत निर्घृण हत्या करण्यात आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. राज्यातील गुन्हेगारी घटनांवरुन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच पालघरमध्ये मायलेकींचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली असून नाल्यामध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत मायलेकींचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बर्डे पाड्याजवळील ही घटना आहे. सुश्मिता प्रविण डावरे (वय, २८) असे मृत महिलेचे नाव असून तिच्यासोबत दोन वर्षांची चिमुकलीही मृतावस्थेत आढळून आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे माय-लेकींचे मृतदेह नाल्यातील दगडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबतची माहिती मिळताच मनोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहेत. ही हत्या आहे की आत्महत्या? याबाबतचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत.
नाशिकच्या चांदवड तालूक्यातील रापली येथिल कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर हा पाच वर्षाचा मुलगा घराच्या अंगणात खेळतांना गायब झाला होता.काल पासून त्याचा शोध नातेवाईकांसह गावकरी घेत होते.आज जिल्हा पोलिस प्रमुख यांनी भेट देत पहाणी केली होती.तर मनमाड,चांदवड येथिल वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी सर्वत्र शोध मोहिम राबविली होती.अखेर संध्याकाळी उशिरा त्याचा मृत देह त्याच्या शेतातील विहिरीत आढळून आला.सामाजिक कार्यकर्ते भागवत झाल्टे यांनी दहा परस खोल विहिरीत उतरत कृष्णा याचा मृत देह विहिरीतून बाहेर काढला.या प्रकरणी पोलिस आता अधिक तपास करीत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.