Crime News: बाळा, फक्त 2 मिनिटे वेदना होतील..., असं म्हणत प्रियकराने केला प्रेयसीचा खून, त्यानंतर ट्रेनसमोर आत्महत्या

Navi Mumbai Crime News: काही दिवसांपूर्वी १९ वर्षीय वैष्णवीची हत्या झाली होती. पोलिसांनी महिन्यानंतर या हत्येचं गूढ उकललं आहे. पोलिसांना मृत तरुणाकडून मोबाईल सापडला आहे. या मोबाईलमध्ये व्हॉईस नोट होती. त्याआधारे पोलिसांनी तपास केलाय.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On

Boyfriend killed Girlfriend

महाराष्ट्रातील नवी मुंबई (Navi Mumbai Crime) येथून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या वैष्णवीच्या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलंय. वैष्णवी नावाच्या तरुणीची तिच्याच प्रियकराने गळा आवळून हत्या केली होती. नंतर प्रियकराने स्वतः आत्महत्या केली होती. खून करणाऱ्या तरुणाच्या मोबाईलमध्ये पोलिसांना व्हॉईस नोट सापडली आहे. यात त्याने.. फक्त 2 मिनिटे, जास्त त्रास होणार नाही… मग आपण दुसऱ्या आयुष्यात प्रवेश करू, असं म्हटलं होतं. (latest crime news in marathi)

खारघरमध्ये २४ वर्षीय आरोपी वैभव बुरुंगले याने वैष्णवीची हत्या केली, असं पोलिसांनी सांगितलं आहे. खून केल्यानंतर त्याने तिचा मृतदेह तेथेच टाकून दिला. नंतर स्वत: प्रियकराने रेल्वेखाली धावून आत्महत्या केली. १९ वर्षीय वैष्णवी बाबर आणि वैभव बुरंगळे हे नवी मुंबईतील कळंबोली परिसरात राहत होते. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. त्यांना लग्न करायचे होतं, पण घरच्यांचा त्यांना विरोध होता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीस तपास

हत्येच्या (Navi Mumbai Crime) घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, १२ डिसेंबर रोजी वैष्णवी कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली होती. यानंतर ती परतली नाही. मुलगी बेपत्ता झाल्यामुळं कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. महिना उलटला तरी पोलिसांना तिचा कोणताही सुगावा लागलेला नव्हता. या घटनेचा तपास गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाकडे सोपवण्यात आला होता. तपासासाठी पथक नेमण्यात आलं होतं. वैष्णवीचा शोध घेण्यासाठी टीमने तिच्या कॉलेजमधून चौकशी सुरू केली. सीसीटीव्ही तपासात वैष्णवी एका मुलासोबत कुठेतरी ट्रेनमधून निघून गेल्याचं समोर आलं. त्या मुलासोबत ती खारघर रेल्वे स्टेशनवर उतरली. इथून ती टेकडीच्या दिशेने गेली. काही वेळाने मुलगा एकटाच डोंगरावरून खाली आल्याचं सीसीटीव्हीत दिसून आले. वैष्णवी त्याच्यासोबत नव्हती. टेकडीवर काहीतरी विचीत्र घडल्याचा संशय पोलिसांना होता.

पोलिसांनी अपघातापूर्वी वैष्णवी ज्याच्यासोबत दिसली होती, त्या तरूणाचा शोध सुरू केला. त्याच दिवशी जुईनगर स्थानकावर एका तरुणाने आत्महत्या केल्याची त्यांना माहिती मिळाली. हा मृत तरुण वैष्णवीचा प्रियकर असल्याचं पोलीस तपासात (Boyfriend killed Girlfriend) समोर आलं आहे. वैभव बुरुंगले असं मृत तरुणाचं नाव आहे.

Crime News
Navi Mumbai Crime: ११ वर्षांनी मोठी प्रेयसी, लग्नाचा हट्ट आणि आक्षेपार्ह फोटो; प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

मोबाईलवरून उघड झालं प्रकरण

मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यापूर्वी पोलिसांनी वैभवचा मोबाईल जप्त केला. या फोनमध्ये अनेक पुरावे सापडले. पोलिसांना त्या मोबाईलमध्ये एक व्हॉईस नोटही सापडली आहे. या व्हाईस नोटमुळे खुनाचं गूढ (Navi Mumbai Crime) उकललं. या व्हॉईस नोटमध्ये ऐकले होते की बाळा, फक्त 2 मिनिटे, जास्त त्रास होणार नाही, मग आपण दुसऱ्या आयुष्यात प्रवेश करू. ही व्हॉइस नोट ऐकल्यानंतर त्यांच्या लग्नात काही अडचण आल्याचं पोलिसांना वाटलं. यामुळे त्याने आधी प्रेयसीचा खून केला आणि नंतर ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली.

या विशेष कोडसह मुलीचा मृतदेह सापडला

व्हॉईस नोट ऐकल्यानंतर वैभवनेच वैष्णवीचा खून केल्याची पोलिसांची खात्री पटली. मात्र, तिचा मृतदेह पोलिसांना सापडला नाही. वैष्णवीचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चार दिवस शोध घेतला पण काहीही सापडले नाही. मोबाईलमध्ये 'L01-501' हा कोड नमूद करण्यात आला (Boyfriend killed Girlfriend) होता. पोलीस या कोडचा तपास करत होते. तपासादरम्यान पोलिसांना टेकडीवर अंक लिहिलेली झाडे सापडली. पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने 'L01-501' या क्रमांकाच्या झाडाचा शोध घेतला. पोलीस त्या झाडाजवळ पोहोचले. त्या झाडाजवळ एक कुजलेला मृतदेह आढळून आला. तिच्या ड्रेस आणि घड्याळावरून मुलीची ओळख पटली. तेव्हा मृत तरुणी वैष्णवी असल्याचं समजले, अशी माहिती टीव्ही९च्या वृत्ताने दिलीय.

Crime News
Navi Mumbai Crime: प्रेयसीची हत्या करत स्वतः केली आत्महत्या ; सांकेतिक क्रमांक लिहत रचलेल्या कटाचा पोलीस तपासात उलगडा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com