Nanded News: वर्ल्डकप विजयाच्या जल्लोषाला गालबोट; टोळक्याकडून विद्यार्थ्यांना मारहाण, घटना CCTV मध्ये कैद

Mob Beaten Students : विजयाचा जल्लोष साजरा का करता म्हणून एका टोळक्याने घरात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली.मारहाणीत ३ ते ४ जण जखमी झालेत. मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालीय.
Nanded News: वर्ल्डकप विजयाच्या जल्लोषाला गालबोट; टोळक्याकडून विद्यार्थ्यांना मारहाण, घटना CCTV मध्ये कैद
Mob Beaten Students CCTVsaam Tv
Published On

संजय सुर्यवंशी, साम प्रतिनिधी

टी२० विश्वचषकात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. या विजयाचा जल्लोष संपूर्ण भारतात साजरा होत आहे. पण या विजयाचा जल्लोषाला नांदेडमध्ये गालबोट लागलं. येथील काही जणांना विजयाचा जल्लोष करणं भावलं नाही. एका टोळक्यानं विजयाचा जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केलीय. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.

नांदेड शहरातील श्रीनगर भागात राहणारे गजानन देगलूरकर यांच्या निवासस्थानी भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. मात्र जल्लोष करणं तेथील शेजारच्यांना आवडलं नाही. तेथील एका टोळक्याने देगलूरकर यांच्या घरात घुसून जल्लोष साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केली.जवळपास १५ ते २० जणांनी विद्यार्थ्यांना मारहाण केलीय. हातात हॉकी आणि स्टिक घेऊन आलेल्या या टोळक्याने जबर मारहाण केली. यात ३ जण जखमी झालेत.

संपूर्ण देशभरात जल्लोष

टीम इंडियाने सामना जिंकल्यानंतर देशातील प्रत्येक शहरात आणि गावात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या गेल्या यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर एकच आनंद पाहायला मिळाला. सर्वस्तरावरून टीम इंडियातील सर्वच खेळाडूंचे कौतुक केले. मात्र नांदेडमधील श्रीनगर भागात राहणाऱ्या काही लोकांना विजय जल्लोष करणं आवडलं नाही. भारताच्या विजयानंतर जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना टोळक्याने हॉकी स्टीकने जबर मारहाण केली.

Nanded News: वर्ल्डकप विजयाच्या जल्लोषाला गालबोट; टोळक्याकडून विद्यार्थ्यांना मारहाण, घटना CCTV मध्ये कैद
T20 World Cup: टीम इंडियाच्या विजयाचा संपूर्ण देशभरात जल्लोष, क्रिकेटप्रेमींनी फटाके फोडत पेढे वाटून साजरा केला आनंद, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com