पोलिसांच्या त्रासाला कंटाळून बिल्डरनं मुलाच्या घरी आयुष्य संपवलं, चिठ्ठीत पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव; नालासोपाऱ्यात खळबळ

Nalasopara Crime News : नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून नालासोपाऱ्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकानं आत्महत्या केल्याची घटना घडली.
Nalasopara Builder Suicide
Nalasopara Builder SuicideSaam Tv News
Published On

पालघर : नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून नालासोपाऱ्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकानं आत्महत्या केल्याची घटना घडली. जयप्रकाश चौहान असं त्या बिल्डरचं नाव असून त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी शाम शिंदे आणि राजेश महाजन या पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव लिहून तेच मृत्यूसाठी जबाबदार आहेत असं सांगितलं.

नालासोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर येथे मयत जयप्रकाश चौहान यांनी ओम श्री दर्शन ही इमारत पुनर्विकासासाठी घेतली होती. त्या बांधकामासाठी पोलीस शिपाई शाम शिंदे याने त्याच्या नातलगाच्या माध्यमातून ५० लाखांचं फायनान्स केलं होतं. एका वर्षात दुप्पट रकमेच्या आश्वासनावर त्याने पैसे दिले होते. तसेच जामीन म्हणून चार फ्लॅटचा ताबाही लिहून घेतला होता.

Nalasopara Builder Suicide
Devendra Fadnavis: महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती,पण हिंदीचाही अभिमान: मुख्यमंत्री फडणवीस

काही दिवसांनी वेळ झाल्यानं पोलीस शिपाई शाम शिंदे आणि त्याचा सहकारी राजेश महाजन तसेच मध्यस्थ लाला लजपत या तिघांनी मिळून मयत जयप्रकाश चौहान यांच्याकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला. जयप्रकाश यांनी २२ लाख ॲानलाईन आणि १० लाख रोख रक्कम असे एकून ३२ लाख दिल्याचं नातेवाईक आणि मित्रांनी सांगितलं. मात्र तरीही शाम शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जयप्रकाश यांना पैशासाठी त्रास दिला.

'ती बिल्डिंग आता आमची आहे, तू सोडून जा, अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकवणार', अशी धमकी शाम शिंदे याने दिल्याचा दावा चौहान कुटुंबीयांनी केला आहे. शाम शिंदेच्या त्रासाला कंटाळून जयप्रकाश चौहान यांनी अखेर मुलाच्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली. आपण पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे.

Nalasopara Builder Suicide
Pandharpur Wari: विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-२०२५: वारकऱ्यांसाठी विमा, अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकारकडून मिळेल लाखो रुपयांची मदत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com