बाळ होत नाही म्हणून नीतू छांगुर बाबाला भेटली, नवऱ्यासोबत मिळून...; उत्तर प्रदेशमधील बाबाचं मुंबई कनेक्शन उघड

Changur Baba Mumbai Connection : उत्तर प्रदेशमधील छांगुर बाबाच्या धर्मांतरच्या रॅकेटनं संपूर्ण उत्तर प्रदेश हादरून गेला आहे. छांगुर बाबा हा मुंबतील दाम्पत्य नवीन वोहरा आणि नीतू वोहरासोबत मिळून हे रॅकेट चालवत होता. सध्या, छांगुर बाबा उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहे.
Changur Baba Mumbai Connection
Changur Baba Mumbai ConnectionSaam Tv News
Published On

मुंबई : उत्तर प्रदेशमधील छांगुर बाबाच्या धर्मांतरच्या रॅकेटनं संपूर्ण उत्तर प्रदेश हादरून गेला आहे. छांगुर बाबा हा मुंबतील दाम्पत्य नवीन वोहरा आणि नीतू वोहरासोबत मिळून हे रॅकेट चालवत होता. सध्या, छांगुर बाबा उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणामुळे मुंबईची नीतू वोहरा देखील चर्चेत आली आहे. खरंतर नीतू आणि नवीन हे पती-पत्नी आहेत. पण दोघेही छांगुर बाबाच्या संपर्कात आले आणि त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. नंतर तिघांनीही हिंदू मुलींना त्यांच्या जाळ्यात अडकवण्यास सुरुवात केली.

कोण आहे नीतू वोहरा उर्फ नसरीन?

मिळालेल्या माहितीनुसार, नीतू आणि नवीन वोहरा हे तामिळनाडूची रहिवासी आहेत. नीतूचं लग्न नवीन वोहराशी झालं होतं. मात्र, लग्नानंतर तिला मुलं झाली नाहीत. तिला गरोदरपणात काही अडचणी येत होत्या. या काळात नवीन बलरामपूरच्या छांगुर बाबाच्या संपर्कात आला.

Changur Baba Mumbai Connection
Horrible News: भररस्त्यावर अर्धनग्न करून संतापजनक कृत्य; दोघांनी अपंग व्यक्तीबरोबर 'नको ते केलं' VIDEO व्हायरल

छांगुर बाबाशी संपर्क वाढत गेला

नीतू आणि नवीन मुंबईहून बलरामपूरला बाबाला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी गरोदरपणात अडचणी आणि काही मानसिक त्रास होत असल्याचं नितूने बाबाला सांगितलं. हे ऐकून छांगुर बाबाने तिला काही औषधे दिली आणि त्याची एक अंगठी सुद्धा दिली. त्यानंतर नवीन आणि नितू मुंबईहून बऱ्याच वेळा बलरामपूरला आले आणि बाबाला भेटू लागले. छांगुर बाबाने नीतू वोहरा आणि तिचा पती नवीन वोहरा यांचं धर्मांतर केलं. धर्मांतर केल्यानंतर नीतू वोहरा हिचं नाव नसरीन आणि नवीन वोहरा याचं नाव जमालुद्दीन असं ठेवण्यात आलं.

धर्मांतराचं रॅकेट चालवण्यात सहभागी

पती-पत्नी दोघेही बाबासोबत वेळ घालवू लागले. छांगुर बाबा नसरीनसोबत राहू लागला. मग तिघांनीही एकत्र येऊन हे धर्मांतराचं रॅकेट वाढवलं. छांगुर बाबा नसरीनला पत्नी म्हणून वागणूक देत होता. आता ते तिघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी आरोपी बाबाच्या मुलालाही अटक केली आहे.

Changur Baba Mumbai Connection
Shocking: प्रसिद्ध व्यावसायिकानं गोळ्या झाडून स्वत:ला संपवलं; फेसबुक लाईव्हवर सांगितलं आत्महत्येचं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com